PF चे पैसे लवकरच UPI आणि ATM मधून काढता येणार आहेत
लवकरच ही सुविधा सुरूर करण्यात येणार आहे
या सुविधेमुळे PF रक्कम मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सेवांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्यासाठी यूपीआय आणि एटीएमचा वापर करता येणार आहे. सरकारने याबाबतची प्रक्रिया जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले असून, या महिन्याच्या अखेरीस ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा नोकरदारवर्गाला होणार आहे. जाणून घ्या UPI आणि ATM मधून किती पैसे काढता येणार?
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनीही या सेवेबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे संकेत दिले आहेत. या सुविधेमुळे पीएफ सदस्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळू शकणार आहे.
सध्या पीएफमधून पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि ऑनलाईन प्रक्रियेनंतर रक्कम खात्यात जमा होण्यासाठी साधारणपणे १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. मात्र, यूपीआय आणि यूपीआय-सक्षम एटीएमद्वारे ही प्रक्रिया सोपी होऊ शकते. एटीएम किंवा यूपीआयद्वारे किती रक्कम काढता येईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नियमांनुसार, सदस्यांना त्यांच्या एकूण पीएफ निधीपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते. तसेच, सदस्यांना ओळख पडताळणीसाठी अनेक कागदपत्रांची गरज भासणार नाही. उमंग ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) वापरून माहिती अपडेट करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.