ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
नियोक्त्यांना १५ मेपर्यंत ईसीआर जमा करणे अनिवार्य
कर्मचाऱ्यांचा पीएफ, पेन्शनवर होणार परिणाम
ईपीएफओ कर्मचारी आणि नियोक्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता नियोक्त्यांना ईसीआर जमा करण्यासाठीही मुदत जवळ आली आहे. १५ मेपर्यंत नियोक्त्यांना ईसीआर जमा करायचा आहे. अन्यथा कंपनीला आणि कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ईसीएस जमा करण्यास सांगितले आहेत.
ईसीआर हा एक डिजिटल रिपोर्ट आहे.यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि पीएफची सर्व माहिती असते.जर तुम्ही एखाद्या संस्थेत काम करत असेल तर कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला जातो. दरम्यान, ईपीएफओने सर्व नियोक्त्यांना ईसीआर म्हणजे Electronic Challan-cum-Return जमा करण्यास सांगितले आहे. यासाठी १५ मेपर्यंतची तारीख आहे.
ईपीएफओने सांगितले की, ईसीआर जमा करणे ही फक्त औपचारिकता नसून कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी गरजेचे आहे. कंपनी जर वेळेवर पीएफ जमा करत नसेल तर त्याचा परिणाम थेट पीएफ खाते, वीमा आणि पेन्शनवर पडणार आहे. तुमचा पीएफ किती जमा होतो, किती पेन्शन मिळणार याबाबतची सर्व माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
ईसीआर नक्की आहे तरी काय?( What is ECR In EPFO)
ईसीआर हा एक डिजिटल रिपोर्ट आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार आणि पीएफची सर्व माहिती असते. याद्वारे पीएफ जमा होतो. ईपीएफ अकाउंट अपडेट होते. पेन्शनचा रेकॉर्डदेखील मिळतो. याचसोबत EDLI बीमा स्कीम सुरु असते. हे कागदपत्र खूप जास्त महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.