EPFO UPI PF Withdrawal 75% PF Money Withdrawal Facility Soon Saam Tv
बिझनेस

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता UPIद्वारे काढता येणार PFचे पैसे; जाणून घ्या नवी सुविधा

EPFO Update News : EPFOकडून PF खात्यातील पैसे UPIच्या माध्यमातून काढण्याच्या सुविधेची चाचणी सुरू आहे. ७५ टक्क्यांपर्यंत PF रक्कम काढण्याची शक्यता आणि नव्या सुविधेबद्दल जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • EPFOकडून UPIद्वारे PF पैसे काढण्याच्या सुविधेची चाचणी सुरू आहे

  • नवीन सुविधेमुळे PF Withdrawal प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होण्याची शक्यता

  • पात्र PF बॅलन्सपैकी 75% पर्यंत रक्कम UPIद्वारे काढता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO (Employees' Provident Fund Organisation) खातेदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता लवकरच PF खात्यातील पैसे काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि जलद होण्याची शक्यता आहे. EPFO कडून UPIच्या माध्यमातून PFचे पैसे काढण्याच्या सुविधेची चाचणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही बँकांसोबत टेस्टिंगही सुरू असल्याची माहिती आहे. ही सुविधा डिसेंबरच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता असून, अंतिम लॉन्चची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

UPI मधून PF काढता येणार

सध्या PFमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना UAN पोर्टलवरून ऑनलाइन क्लेम करावा लागतो. हा क्लेम मंजूर झाल्यानंतर PFची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यानंतरच त्या पैशांचा वापर करता येतो. मात्र, नवीन सुविधेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. EPFOची योजना UAN पोर्टलला सदस्याच्या UPI खात्याशी जोडण्याची आहे. यामुळे PFशी संबंधित व्यवहार आणि पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक वेगाने करता येण्याची शक्यता आहे. याशिवाय EPFOकडून एक नवीन अॅपही लाँच केले जाऊ शकते. हे अॅप बँक खात्याशी जोडले जाण्याची शक्यता असून, BHIMसह इतर UPI अॅप्सशीही ते जोडता येऊ शकते.

75 टक्के रक्कम काढता येणार?

नियमांनुसार,पात्र PF बॅलन्सपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम UPIच्या माध्यमातून काढता येण्याची शक्यता आहे. तसेच उरलेले २५ टक्के रक्कम PF खात्यात ठेवली जाईल. ही रक्कम शिक्षण, लग्न, घराशी संबंधित खर्च यांसारख्या ठरावीक कारणांसाठी काढता येईल. खात्यात शिल्लक असलेल्या या रकमेवर करमुक्त व्याज मिळत राहील.

PF वेतन मर्यादा २५ हजार

दरम्यान, सरकारने PF साठीची वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १२ वर्षांनंतर ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.या बदलामुळे सुमारे ५१ लाख अतिरिक्त कर्मचारी अनिवार्य PF कव्हरेजच्या कक्षेत येऊ शकतात. सध्या EPFOचे सुमारे ३० कोटी सदस्य असून, त्यापैकी जवळपास ७.५ कोटी सदस्य नियमित योगदान देत असल्याचे सांगितले जाते. EPFOच्या निधीचा एकूण आकार सुमारे २६ लाख कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची लोणावळामध्ये कारवाई

Navratri 2026: नवरात्रीत रोज दिसा हटके! नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी परफेक्ट लूक आयडिया

PF Balance Check: वेज सीलिंगनंतर या महिन्यात पगारातून किती PF कापला? घरबसल्या 1 मिनिटात करा चेक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दसऱ्याचं गिफ्ट मिळणार, या तारखेला खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Maharashtra weather today: राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका! अनेक शहरांत तापमान ३५° पार, तर कोल्हापूर-सांगलीत पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT