EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO चा मोठा निर्णय! फक्त महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन

EPFO New Rule For Pension: ईपीएफओच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही फक्त १ महिन्यात नोकरी सोडली तरीही तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

Siddhi Hande

EPFO चा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

एक महिन काम केले तरीही मिळणार पेन्शन

याआधी काही ठरावीक कालावधी पूर्ण केल्यानंतरच मिळत होती पेन्शन

EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ईपीएफओने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे. आता तुम्ही १ महिनादेखील नोकरी केली तरीही तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे. तुमचे ईपीएसमधील पैसे तुम्हाला मिळणार आहेत.याआधी फक्त काही ठरावीक काळ नोकरी केली तरच तुम्हाला पेन्शन मिळत होती.

आता EPS च्या नियमाअंतर्गत, जर कोणी ६ महिन्यांच्या आत नोकरी सोडली तर त्यांना झिरो कम्प्लीट ईअरअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता. दरम्यान, आता या नियमांत बदल करण्यात आला आहे. नवीन नियमाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला आहेत. त्यामुळे तुम्ही आता १ महिना जरी नोकरी केली तरीही तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार आहे.

प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला EPS खात्यात ठरावीक रक्कम जमा करतात. ही रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळत होती. परंतु यासाठी काही अटी होत्या. या अटींमध्ये तुम्हाला ठरावीक कालावधी केल्यानंतरच पेन्शन मिळत होती. मात्र, आता या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ईपीएफओने आता स्पष्ट केले आहे की, जर कोणताही व्यक्ती केवळ १ महिन्यासाठी नोकरी करत असेल आणि ईपीएसमध्ये पैसे जमा करत असेल तर त्याला पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

नवीन नियमाचा फायदा कोणाला होणार? (EPFO New Rule Benefits)

ईपीएफओच्या या नवीन नियमांचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना होणार आहे. बीपीओ, लॉजिस्टिक्स या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने खूप कमी कालावधीत नोकरी सोडली तर त्यांना या नियमाचा फायदा होणार आहे. त्यांनादेखील पेन्शन मिळणार आहे. त्यांना पीएफमधील पैसे मिळतील. या नियमाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

BMC Election : मनसेसोबतच्या युतीच्या घोषणेआधी ठाकरेंना जोरदार धक्का, शिवसेनेच्या बड्या नेत्याने साथ सोडली

Success Story: भावाच्या पावलावर पाऊल! मोठा भाऊ IAS, लहान भावानेही क्रॅक केली UPSC; उत्कर्ष यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

Mahayuti Politics : महायुतीत जागांसाठी रस्सीखेच; जागावाटपात शिंदेसेनेचा वेगळाच फंडा, VIDEO

SCROLL FOR NEXT