EPFO कडून निष्क्रिय खात्यांवरील रक्कम थेट बँकेत जमा.
१००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी शिल्लक असलेल्या खात्यांना लागू.
कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कामगार मंत्रालयाने पीएफशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या नवीन योजनेअंतर्गत, बंद खात्यांमधील पैसे कोणत्याही कागदपत्रांशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ही नवीन योजना अशा इनऑपरेटिव किंवा निष्क्रिय खात्यांसाठी लागू असेल. यामध्ये जमा केलेली रक्कम १००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ती बँकेत जमा होणार आहे.
कामगार मंत्रालयाच्या या मोठ्या निर्णयाचा थेट फायदा लाखो ईपीएफओ सदस्यांना होणार आहे. नोकरी बदलल्यानंतर लोक त्यांचे जुने खाते विसरून जातात. किंवा छोट्या रकमेसाठी गुंतागुंतीचे कार्यालयीन कागदपत्रांची पुर्तता करावी लागतात, त्यामुळे ते खात्यातील पैसे तसेच पडू देतात. या नवीन प्रणालीमुळे खातेधारकांना हे पैसे सहजपणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकतील.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खातेधारकांना आता स्वतःहून कोणतेही अर्ज सादर करण्याची आवश्यकता नसणार आहे. ज्यांची खाती आधार कार्डशी लिंक आहेत, त्यांच्या बँक खात्यात EPFO विभाग तात्काळ निधी हस्तांतरित करेल. उर्वरित निधी देखील टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये हस्तांतरित करेल. नियमांनुसार जर EPFO खात्यात सलग तीन वर्षे कोणतीही उलाढाल झाली नसेल तर ते खाते निष्क्रिय मानले जाते.
सध्या ही परतफेड प्रक्रिया पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, एकूण ३.१ दशलक्ष निष्क्रिय खात्यांमधून अंदाजे ६,००,००० खाती निवडण्यात आली आहेत. जर हा सुरुवातीचा प्रयोग यशस्वी झाला, तर उर्वरित सुमारे २५ लाख निष्क्रिय खात्यांसाठी हीच स्वयंचलित प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.
आकडेवारी पाहता, एकूण ३१.८६ लाख निष्क्रिय ईपीएफओ खाती आहेत, त्यात अंदाजे १०,९०३ कोटी रुपयांची मोठी रक्कम जमा आहे. त्याच वेळी, ज्या खात्यांमध्ये १००० रुपयांपर्यंतच्या कमी रकम पडून आहेत त्यांची संख्या सुमारे ६ लाख आहे. त्यानुसार एकूण ३०.५२ कोटी रुपये खात्यात जमा आहेत. ही अशी खाती आहेत ज्यात तीन वर्षांपासून ते वीस वर्षांपर्यंत कोणत्याही आर्थिक हालचालींची नोंद नाही आणि त्यांचे पैसे निष्क्रिय पडले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.