EPFO 3.0 Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0: आनंदाची बातमी! अवघ्या ८ दिवसात खात्यात जमा होणार PF चे पैसे; सर्व प्रक्रिया होणार ऑनलाइन

EPFO PF Withdrawal in Just 8 Days: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता पीएफचे पैसे फक्त ८ दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ईपीएफओची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

अवघ्या ८ दिवसात खात्यात येणार पीएफचे पैसे

EPFO 3.0 मुळे सर्व कामे ऑनलाइन होणार

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफ काढणे आणखी सोयीस्कर होणार आहे. ईपीएफओ सिस्टीम आता पूर्णपणे डिजिटल आणि स्मार्ट झाली आहे. ईपीएफओसंबंधित सर्व कामे आता ऑनलाइन होणार आहेत. EPFO 3.0 सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे. दरम्यान, या सुविधेमुळे सर्व कामे सोपी आणि जलद गतीने होणार आहेत.

८ दिवसात येणार पीएफचे पैसे (PF Withdrawal in Just 8 Days)

केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे. आता ऑनलाइन ईपीएफ क्लेम केल्यानंतर ८ दिवसात खात्यात पैसे जमा होणार आहेत. तुमची सर्व माहिती बरोबर असेल, KYC झाली असेल तर तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहे. यासाठी एक आठवड्याभराचा वेळ पुरेसा आहे.

पीएफ काढण्यासाठी वाट पाहायची गरज नाही

याआधी ईपीएफचे पैसे येण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागायची. अनेकदा नियोक्त्याची मंजुरी येण्यास उशिर व्हायचा त्यामुळे पैसे जमा व्हायचे नाहीत. मात्र, आता EPFO 3.0 मुळे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. तुम्हाला अर्जदेखील ऑनलाइन करायचा आहे आणि तुमचे पैसेदेखील ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये २३ जानेवारीआधी ८.५३ कोटींपेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांनी पीएफ क्लेम होते.या संख्येत वाढ होत आहे.

नियोक्त्याच्या मंजुरीची गरज नाही

EPFO 3.0 चा सर्वाधिक फायदा केवायसी केलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यांना नियोक्त्याच्या मंजुरीशिवाय ऑनलाइन क्लेम करता येणार आहे. ज्यांनी नोकरी बदलली आहे आणि त्यांचा जुन्या कंपनीशी संपर्क होत नाही या कर्मचाऱ्यांना खूप अडचणी यायच्या. परंतु आता कर्मचारी स्वतः पोर्टलवरुन हे काम करु शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज घेणार माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी

Ukad Shenga Recipe: होळीला पुरणपोळीच कशाला? बनवा ओल्या नारळाच्या उकडशेंगा, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

नरसंहार! इस्त्राईलचा इराणच्या शाळेवर हल्ला, 100 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Holi Party 2026 : सँडविच ढोकळा कधी खाल्ला आहात का? होळीला करा कलरफुल नाश्ता, पेटपूजा होईल बेस्ट

SCROLL FOR NEXT