EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! UPIद्वारे PF होणार ट्रान्सफर; व्हॉट्सअपवर 24x7 सेवा; लवकरच सुरु होणार सुविधा

EPFO 3.0 Update: ईपीएफओ सदस्यांसाठी लवकरच नवीन सुविधा सुरु केली जाणार आहे. आता कर्मचाऱ्यांना एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ काढता येणार आहे. याचसोबत व्हॉट्सअॅपवर २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफ

व्हॉट्सअॅपवर मिळणार २४ तास सेवा

नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कर्मचाऱ्यांचा त्यांचा पीएफ लवकरात लवकर काढता येणार आहे. पीएफ काढण्यासाठी जास्त दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. याचसोबत कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पीएफ काढू शकतात. सरकार ईपीएफओ सिस्टीममध्ये महत्त्वाचा बदल करणार आहे.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांचा पीएफ आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. एटीएम किंवा यूपीआयद्वारे तुम्ही पीएफ ट्रान्सफर करु शकतात. याचसाठी २४ तास व्हॉट्सअॅप सेवादेखील सुरु आहे. याचसोबत ५ लाखांची ऑटो सेटलमेंट सुविधादेखील सुरु होणार आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओने यूपीआयद्वारे पीएफ काढण्याच्या सुविधेची टेस्टिंग पूर्ण केली आहे. लवकरच ही सुविधा सुरु होईल. यामुळे ७ कोटींपेक्षा जास्त ईपीएफओ सदस्यांना फायदा मिळणार आहे.

यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे (PF Wthdrawal Through UPI)

आता पीएफ काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना ईपीएफओ पोर्टलवर क्लेम करावे लागते. ही संपूर्ण प्रोसेस होण्यासाठी खूप दिवस लागतात. दरम्यान, आता या नवीन सुविधेमुळे पीएफचे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या खात्यात पैसे दिसणार आहेत. यानंतर यूपीआयद्वारे तुम्ही पैसे काढू शकतात.

व्हॉट्सअॅपवर २४ तास सेवा सुरु

ईपीएफओ सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप आधारित सेवा सुरु केली जाणार आहे. याद्वारे कर्मचारी घरबसल्या सर्व माहिती मिळवू शकतात. ईपीएफओच्या नंबरवर मेसेज करुन तुम्ही माहिती मिळवू शकतात. यानंतर तुम्हाला पीएफ बॅलन्स, ट्रान्झॅक्शन, क्लेम स्टेट्‍स याबाबत सर्व माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया

Death News : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अन् अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

8th Pay Commission Pension: कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! जुनी पेन्शन योजनेबाबत नवी माहिती समोर

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, २४ कॅरेट गोल्ड ₹४३०० नं स्वस्त, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

भन्नाट युक्ती! फ्रिजमध्ये ठेवा १ रुपयाचे नाणं अन् पाहा कमाल

SCROLL FOR NEXT