EPFO Saam Tv
बिझनेस

आता काही सेकंदातच काढता येणार PF चे पैसे, EPFO 3.0 नक्की आहे तरी काय?

EPFO 3.0 Launch Soon: केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांसाठी EPFO 3.0 सेवा लाँच करणार आहे. यामुळे आता काही सेकंदातच कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढता येणार आहेत.

Siddhi Hande

पीएफ अकाउंटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लवकरच ईपीएफओ ३.० लाँच करणार आहे. याबाबत केंद्रिय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी माहिती दिली आहे. या नवीन योजनेतून कर्मचाऱ्यांना अनेक फायदे होणार आहे. यामुळे पीएफच्या कामांसाठी ऑफिसमध्ये फेऱ्या घालण्याची गरज भासणार नाही. (EPFO 3.0)

पीएफ खाते बँक खात्यासारखे काम

केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत EPFO 3.0 व्हर्जन येणार आहे. ही एक डिजिटल प्रणाली असणार आहे. या नवीन योजनेअंतर्गत ईपीएफओचे कामकाज बँकेसारखे होणार आहे. यामुळे तुम्ही कोणतीही अडचणीशिवाय एटीएममधून पीएफचे पैसे काढता यणार आहेत.

ईपीएफओ सदस्य त्यांचे काम युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे करु शकतील. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ईपीएफ कार्यालयात जावे लागणार नाही. ते बँकेतून किंवा एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत.

काही सेकंदात काढता येणार पीएफचे पैसे

EPFO 3.0 अंतर्गत पीएफचे पैसे आता पूर्णपणे तुमच्या हातात असणार आहे. तुम्ही कधीही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकणार आहात. यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागत होता. त्यानंतर एचआरकडून सही घ्यावी लागत होती. मात्र, आता हे सर्व काम कमी होणार आहे. तुम्ही बँक खात्याप्रमाणेच पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार आहात.

याचसोबत तुम्ही अॅपद्वारे पीएफची स्थिती आणि तुमच्या अकाउंटमधील पैसे चेक करु शकतात. याचसोबत क्लेम सेटलमेंट करु शकतात. यामुळे तुमची ऑफलाइन कामातून सुटका होणार आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने पीएफची सर्व कामे होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT