EPF  Saam Tv
बिझनेस

EPF Withdrawal Rule: आता फक्त १० वर्षात काढता येणार PF चे पूर्ण पैसे; EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

EPF Withdrawal New Rule: ईपीएफओ लवकरच पीएफ काढण्याच्या नियमांत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही १० वर्षात पूर्ण पीएफ काढू शकतात.

Siddhi Hande

ईपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच EPF खात्याच्या नियमांत बदल करण्याच्या तयारीत आहे. आता ईपीएफ खातेधारकांना १० वर्षांत एकत्र पीएफचे पैसे काढण्याची परवानगी मिळू शकते. १० वर्षात तुम्हाला तुमचा हिस्सा काढता येण्याची शक्यता आहे. आता पगारदार वर्गाला पीएफची सर्व रक्कम काढण्यासाठी सेवानिवृत्तीची वाट पाहण्याची गरज नाही.

दहा वर्ष पूर्ण पैसे काढा (Now You Can Withdraw Full PF In Just 10 Years)

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, दोन कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरुन ईपीएफओ (Employees’ Provident Fund Organisation)या प्रस्तावावर गांभीर्याने विचारत करत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर १० वर्षात तुम्ही खात्यातून तुम्हाला पैसे काढता येणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, प्रत्येक सदस्याचा पीएफ निधी हा दहा वर्षात वाढतो. त्यांना तो कुठे आणि कसा वापरायचा याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

सध्याचा नियम काय? (EPFO Rules)

सध्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमधून (EPF Full Money Withdrawal) पूर्ण पैसे फक्त दोन स्थितींमध्ये काढता येतात. जेव्हा सदस्य निवृत्त होतो तेव्हा आणि जेव्हा सदस्य दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असतो तेव्हा तुम्हाला पूर्ण पैसे काढता येणार आहे. याशिवाय विविध परिस्थितीमध्ये तुम्हाला काही टक्के रक्कम काढम्याची परवानगी मिळते.

हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर सदस्य ३० किंवा ४० व्या वर्षात ईपीएफ रक्कम काढू शकतात. दरम्यान, यासाठी एक मर्यादादेखील निश्चित केली जाऊ शकते. कर्मचारी फक्त ६० टक्क्यांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा घालू शकतात. हा पर्याय प्रत्येकासाठी वेगवेगळा असेल.

उद्देश

गेल्या दीड वर्षात ईपीएफच्या नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यांचे पैसे अधक सोयीस्कर पद्धतीने काढता यावेत, या उद्देशाने केल्या आहे. आता १० वर्षात पीएफचे पैसे काढता यावे हादेखील यामागचाच एक उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'बिझनेससाठी बापाकडून पैसे आण' मानसिक त्रासाला कंटाळली, विवाहित महिलेने उचललं टोकाचं पाऊल | Jalna

Marathi School : मुंबईत मराठी शाळांची दैना, 6 वर्षांत 39 शाळा बंद | VIDEO

EPFO New Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही होणार फायदा; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT