EPF New Rules  saam tv
बिझनेस

EPF New Rules 2026: नोकरदारांसाठी खूशखबर! पीएफच्या नियमात मोठा बदल; आता २५ हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर मिळणार मोठा फायदा, वाचा सविस्तर

PF Update 2026 : केंद्र सरकारने EPF ची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ रुपये केली आहे. नवीन नियमांमुळे पात्र कर्मचाऱ्यांना पीएम, पेन्शन आणि विमा संरक्षण मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

नोकरी करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF ची वेतनाची मर्यादा १५ हजार रुपयांवरून थेट २५ हजार रुपये केलेली आहे. हा नवीन नियम १७ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाला आहे. त्यामुळे आता १५ हजार ते २५ हजार रुपये मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही PF, पेन्शन आणि विमा संरक्षणाच्या कक्षेत आणले जाणार आहे. मात्र, या बदलामुळे तुमच्या पगारातून PF किती कापला जाणार आणि हातात येणाऱ्या पगारावर काय परिणाम होणार? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

२५ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांसाठी काय बदलले?

आतापर्यंत EPF ची अनिवार्य वेतन मर्यादा १५ हजार रुपये होती. आता ती वाढवून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे याआधी वेतन मर्यादेमुळे PF च्या अनिवार्य कक्षेबाहेर असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांनाही या योजनांचा लाभ मिळणार आहे.

१५ हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांचे काय?

ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांचे PF कव्हरेज बंद होणार नाही. पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधीसारखंच EPF, EPS आणि EDLI योजनांचा लाभ मिळू शकतो.

EPF, EPS आणि EDLI म्हणजे काय?

EPF: कर्मचाऱ्याच्या निवृत्तीसाठी बचत केली जाते. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही योगदान PF खात्यात जमा होते.

EPS:या योजनेतून पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते.

EDLI: नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पात्र कुटुंबीयांना विमा संरक्षण मिळते.

आता PF कपात किती होणार?

समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचे PF साठी ग्राह्य वेतन २० हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत १२ टक्के कर्मचारी योगदानानुसार दरमहा २,४०० रुपये PF जमा होऊ शकतात. याआधी १५ हजार रुपयांच्या मर्यादेनुसार ही रक्कम १,८०० रुपये होती. २५ हजार रुपये वेतनावर १२ टक्के योगदानानुसार कर्मचाऱ्याचा हिस्सा ३,००० रुपये होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष PF कपात ही पात्र वेतन आणि लागू नियमांवर अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य

BDD Homes : बीडीडी चाळीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; ५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

Soap Hacks : उरलेला साबण फेकून देताय? घरातील कामांसाठी असा करा पुनर्वापर

Skin Care: चेहऱ्यावरील काळे डाग होतील कायमचे कमी! करा हे सोपे आणि फायदेशीर घरगुती उपाय, चेहरा होईल ग्लोईंग

Signs of Kidney Damage: ही 4 लक्षणं सांगतात की तुमची किडनी आतून सडलीये; शरीरात होणारे हे बदल वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT