EPFO PF Interest Update google
बिझनेस

EPFO : EPFO चा मोठा इशारा! PF खात्यात व्याज दिसत नाही? घाबरू नका; आधी ही महत्त्वाची माहिती वाचा

PF Interest : EPF खात्यात 8.25% व्याज अजून दिसत नसेल तर घाबरू नका. EPFO टप्प्याटप्प्याने व्याज जमा करत आहे. पासबुक अपडेट व्हायला वेळ लागू शकतो. व्याज येण्याआधी संपूर्ण पीएफ काढणं टाळा.

Sakshi Sunil Jadhav

जर तुमच्या EPF (Employees' Provident Fund) खात्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे ८.२५ टक्के व्याज अजूनही दिसत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) १५ जुलै २०२६ पासून खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रोसेस सुरू केली आहे. पण देशातल्या सर्व खात्यांमध्ये व्याज एकाच वेळी जमा होत नाही. ही प्रोसेस टप्प्याटप्प्याने होत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज आधी दिसतं, तर काहींना काही दिवस वाट पाहावी लागू शकते.

EPFO च्या माहितीनुसार, व्याज खात्यात जमा झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS पाठवला जातो. तसेच सदस्यांना EPFO च्या अधिकृत पोर्टलवर किंवा UMANG ॲपवर लॉग इन करून पासबुकमध्ये व्याजाची नोंद तपासता येते. जर अजून SMS आला नसेल किंवा पासबुकमध्ये व्याज दिसत नसेल, तर त्याचा अर्थ व्या मिळणार नाही किंवा रक्कम कमी होणार आहे, असा अजिबात नाही.

EPF वरचे ८.२५ टक्के वार्षिक व्याज हे प्रत्येक महिन्याच्या खात्यातले शिल्लक रकमेच्या आधारावर मोजले जातात. पण हे व्याज वर्षातून एकदाच खात्यात जमा केलं जातं. त्यामुळे जुलैमध्ये किंवा त्यानंतर व्याजाची नोंद झाली तरी सदस्यांना संपूर्ण व्याजाची रक्कम मिळते. उशीर हा फक्त पासबुकमध्ये नोंद दिसण्याचा असतो.

व्याजाच्या रकमेमध्ये कोणतीही कपात होत नाही. पण सदस्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्याज खात्यात जमा होण्याआधी संपूर्ण EPF रक्कम काढून खातं बंद केल्यावर त्या आर्थिक वर्षाचे व्याज मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे खूप गरज असेल तर व्याज जमा होईपर्यंत संपूर्ण PF काढणं टाळणं योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT