Elon Musk
Elon Musk Saam Tv
बिझनेस

Elon Musk: X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्कने सांगितलं कारण

Rohini Gudaghe

लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्वांना X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. परंतु केव्हापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, हे अजून स्पष्ट नाही. एलॉन मस्कने हा निर्णय घेण्यामागील कारण सांगितलं आहे, ते आपण जाणून घेऊ या.

अमेरिकन अब्जाधीश आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे एलॉन मस्क सांगितलं की, वापरकर्त्यांकडून शुल्क आकारणे हा बॉट्सशी संबंधित समस्या सोडवण्याचा सर्वात थेट आणि सर्वात सोपा मार्ग (X Users Need To Pay) आहे. याआधीही मस्कने आपली भूमिका व्यक्त केली होती, की वापरकर्त्यांकडून शुल्क आकारल्याशिवाय बॉट्स खात्यांची पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही.

जेव्हापासून एलॉन मस्क X (पूर्वीचे ट्विटर) चे मालक बनले. तेव्हापासून त्यांनी संपूर्ण लक्ष X मधून पैसे कमविण्यावर केंद्रित केल्याचं दिसत आहे. प्रथम एलॉन मस्कने X च्या सशुल्क सेवा सुरू (X Users) केल्या. ब्लू टिक शुल्क आधारित केले. ब्लू टिक याआधी मोफत उपलब्ध होते फक्त त्यासाठी काही अटी होत्या.

आता एलॉन मस्कने नवीन वापरकर्त्यांसाठी एक मोठी योजना बनवली आहे. एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, X वर येणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे (X Users Update) लागतील. ती रक्कम मात्र नाममात्र असेल, जरी अजून ते शुल्क नेमके किती असतील हे सांगितलं नाही. शुल्क आकारल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील, असा विश्वास एलॉन मस्कने व्यक्त केला आहे. कारण सध्या कोणीही नवीन खाते तयार करत आहे. कोणाच्याही बाजूने पोस्ट करत आहे. एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे की, बॉट थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

X च्या नवीन धोरणानुसार X वर पोस्ट करणे, एखाद्याची पोस्ट लाइक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि पोस्टला उत्तर देणे यासाठी पैसे द्यावे लागणार आहे. आता फक्त एक खाते मोफत फॉलो करू शकाल. प्लॅटफॉर्मवरील स्पॅम रोखण्यासाठी या धोरणाची दीर्घकाळ चाचणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pachora Accident : रुग्णालयात जात असताना झाला घात; ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Lemon Detergent: लिंबाच्या सालीपासून बनलेलं डिटर्जंट वापरा; भांडी चांदीसारखी चकाकतील

Today's Marathi News Live : Manoj Jarange: नाशिकमध्ये मु्ख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने

Mumbai Lok Sabha: ईशान्य मुंबईत भाजपला मोठा झटका; धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन, गुन्हा दाखल

Madhya Pradesh News: घटस्फोटाच्या अर्जानंतर पतीविरोधातील तक्रार सूडाचे कृत्य नाही, हायकोर्टाने केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT