Anil Ambani News Saam TV News
बिझनेस

Anil Ambani : अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, ३००० कोटींची संपत्ती जप्त, फ्लॅट, प्लॉट अन् ऑफिसला कुलूप

why did ED seize Anil Ambani properties? : अनिल अंबानी यांच्यावर ईडीची मोठी कारवाई. मनी लॉन्डरिंग प्रकरणात मुंबई ते दिल्लीतील तब्बल ४० मालमत्ता जप्त. एकूण ३,०८० कोटींची संपत्ती अटॅच. रिलायन्स फायनान्स प्रकरणात ईडीची धडक मोहीम.

Namdeo Kumbhar

ED Anil Ambani Latest News : अनिल अंबानी यांच्यावर पुन्हा एकदा ईडीने मोठी करावई केली आहे. मुंबईपासून ते दिल्लीमधील संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने अंबानी यांची ३०८० कोटी रूपयांच्या किंमतीच्या ४० संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीमधील अधिकृत सूत्रांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. ईडीने रविवारी अंबानी यांच्या देशभरातील विविध संपत्तीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली.

अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या घरापासून ते दिल्लीमधील रिलायन्स सेंटर प्रॉपर्टी, दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि गोदावरीमधील संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनील अंबानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपनीवर कथित फसवणुकीत ईडीने कारवाई केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Prevention of Money Laundering Act) ईडीने संपत्ती जप्त करण्यासाठी चार आदेश जारी केले होते. या संपत्तीमध्ये ६६ वर्षीय अनिल अंबानी यांचे मुंबईतील पाली हिलमधील घर आणि त्यांच्या समूहाच्या कपंन्या, निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.

राजधानी दिल्लीमध्ये महाराजा रणजीत सिंह मार्गावर रिलायन्स सेंटरचा प्लॉट जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि गोदावरीमधील अन्य संपत्तीचा समावेश आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचं एकूण मूल्य ३०८४ कोटी रूपये इतके आहे. हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) यांच्याकडून करण्यात आलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि मनी लाँडरिंग संदर्भातील आहे.

एस बँकेने २०१७ ते २०१९ यादरम्यान आरएचएफएलमध्ये २९६५ कोटींची तर आरसीएफएलमध्ये २०४५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. ईडीकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, डिसेंबर २०१९ पर्यंत ही गुंतवणूक "नॉन-परफॉर्मिंग" गुंतवणुकीत रूपांतरित झाली होती. त्यामध्ये RHFL वर १,३५३.५० कोटी रुपये आणि RCFL वर १,९८४ कोटी रुपये थकबाकी होती. या प्रकरणातच ईडीकडून अनिल अंबानी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT