E-Shram Card Saam Tv
बिझनेस

E-Shram Card: कामगारांना दर महिन्याला मिळणार ३००० रुपये; ई-श्रम कार्ड नक्की आहे तरी काय? बनवायचं कसं?

What Is E Shram Card: असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी सरकारने खास योजना राबवली आहे. या योजनेत कामगारांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी खास योजना राबवली आहे. सरकार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी ६० वर्षानंतर ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

ई-श्रम योजनेअंतर्गत असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना विमा कव्हरसोबत महिन्याला पेन्शनदेखील मिळते. यासाठी प्रत्येक कामगाराला युनिक डिजिटल कार्ड दिले जाते. त्यामुळे त्या कामगारांची वेगळी ओळख रजिस्टर होते. (E-Shram Card News)

ई-श्रम कार्ड नक्की आहे तरी काय? (What Is E-Shram Card)

संगठित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. EPFO आणि ESIC अंतर्गत त्यांना ही पेन्शन दिली जाते. परंतु जे लोक EPFOशी जोडले गेलेले नाही. त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ३००० रुपये दिले जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.१६ ते ५९ वयोगटातील उमेदवार या योजनेत अर्ज करु शकतात.

ई-श्रम कार्ड कसं बनवावे? (How To Make E-Shram Card)

  • ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला https://eshram.gov.in/ कार्ड बनवावे लागते.

  • होमपेजवर जाऊन तुम्ही रजिस्टर eShram ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

  • यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची माहिती द्यावी लागेल.

  • यानंतर तुमचा पत्ता आणि शैक्षणिक माहिती द्यावी लागणार आहे.

  • यानंतर कौशल्याचे नाव, बिझनेस, तुम्ही कोणते काम करता तो ऑप्शन सिलेक्ट करावा लागले.

  • यानंतर self-declaration फॉर्म सिलेक्ट करावा लागेल.

  • यानंतर फॉर्म भरुन सबमिट करायचा आहे. यानंतर तुमचे ई-श्रम कार्ड तयार होणार आहे. तुम्ही हे डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Viral Video : प्रसिद्ध गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भयंकर घडलं; कॉलेज तरुण स्टेजवर आला अन्...

राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक बिनविरोध नाही; आणखी एका पक्षाचा उमेदवार रिंगणात

Backless Blouse Designs: साडी किंवा लेहेंग्यावर उठून दिसतील हे 5 बॅकलेस ब्लाऊज, नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT