E-Shram Card Saam Tv
बिझनेस

E-Shram Card: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सरकार देतंय ३,००० रुपयांची पेन्शन; ई-श्रम कार्ड योजना नेमकी आहे तरी काय?

E-Shram Card Scheme For Labours: सरकारची असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी खास योजना आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळते.

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योजना राबवली जाते. कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या लोकांना पेन्शनचे पैसे मिळतात. परंतु असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन मिळत नाही. याच लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ई-श्रम योजना राबवली आहे. (E-Shram Card)

ई-श्रम योजनेअंतर्गत कामगारांना प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम दिली जाते. त्यांचे भविष्य आर्थिकदृष्टया सुरक्षित व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना ६० वर्षांनंतर पेन्शन दिली जाते.

ई- श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते. या योजनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ई-श्रम कार्ड बनवून घ्यावे लागेल. (E-Shram Card Scheme)

सरकारने २०२१ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत आतापर्यंत २९.२३ कोटी कामगारांनी अर्ज केला आहे. या योजनेत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास २ लाख रुपये दिले जातात. तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत तु्म्ही ई-श्रमच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT