Dream Home Sales Saam Tv
बिझनेस

Dream Home Sales : काय सांगता? अवघ्या १००० रुपयांत मिळतंय ३१ कोटींचं घर; फक्त आहे एकच अट

Home Buying In Thousand Rupees : घर घेताना बरेच लोक गृहकर्ज घेतात. लोन घेतल्यानंतर त्याचे EMI हप्ते फेडताना आपल्या नाकीनऊ येतात. परंतु, आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत की, फक्त एक हजार रुपयांमध्ये तुम्ही बंगाला खरेदी करु शकणार आहात.

कोमल दामुद्रे

Dream Home Advertisement :

स्वत:चे घर असणे अनेकांची इच्छा असते परंतु, घराच्या वाढत्या किंमती आणि महागाईमुळे प्रत्येकाला घर घ्यायाला काही जमत नाही. महागाईच्या वाढत्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

घर (Home) घेताना बरेच लोक गृहकर्ज घेतात. लोन घेतल्यानंतर त्याचे EMI हप्ते फेडताना आपल्या नाकीनऊ येतात. परंतु, आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत की, फक्त एक हजार रुपयांमध्ये (Price) तुम्ही बंगाला खरेदी करु शकणार आहात.

द सन या इंग्रजी वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हा बंगला ब्रिटनमधील सेंट एग्नेस बीचपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच हे घर परिपूर्ण सुविधांनी बनवलेले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. हा बंगला ओमाझ मिलियन पाउंड हाऊस ड्रॉच्या माध्यामातून विक्रीस काढला आहे.

1. घर इतके महाग का?

मिळालेल्या माहितीनुसार हा एक लकी ड्रॉचा प्रकार आहे. ज्यामध्ये लकी विनरला हा बंगाला मिळणार आहे. या बंगल्याचा प्रचार फेमस अभिनेता अॅलिस्टर मॅकगोवन करत आहे. तसेच याचे पैसे NGO WWF ला देण्यात येतील असे देखील म्हटले आहे. जे नाहीसे होत चालेल्या प्रजातींचे संवर्धन, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, जंगलांचे संरक्षण, जंगलतोड थांबवणे या गोष्टींवर काम करते आहे.

या घरामध्ये खोल्या, पार्किंग आणि सुंदर असे डिझाइन केलेले अंगण आहे. तसेच आतमध्ये गार्डन देखील आहे. या घरात तळमजल्यावर दोन डबल बेडरुम आणि फ्री-स्टँडिंग बाथरूम आहे. तसेच यात शॉवर रुम देखील आहे.

घराच्या मागच्या बाजूला सुंदर असे गार्डन असून तेही निसर्गाने फुललेले आहे. या घराची खरी किंमत ३१ कोटी रुपये इतकी आहे. जर लकी ड्रॉमध्ये तुम्ही जिंकलात तर तुम्हाला तीन लाख रुपये महिन्याला भाडे मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला यासोबत एक कोटी रुपये देखील दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT