LPG Cylinder Price Saam Tv
बिझनेस

LPG price Hike : महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील ताजे दर काय?

latest LPG cylinder price in Mumbai Pune : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह प्रमुख शहरांतील नवीन गॅस सिलिंडर दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

LPG price Hike Gas Cylinder Rate : घरगुती एलपीजीच्या १४.२ किलो सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. या ताज्या दरवाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपये झाली आहे. आज सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.

आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात ताण येत असतानाच ही दरवाढ करण्यात आली आहे. २९ रूपयांची ही दरवाढ देशभरात लागू झाली आहे. स्थानिक कर आणि वाहतूक खर्चातील फरकामुळे सिलेंडरचे दर प्रत्येक शहरानुसार वेगळे असतील. मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ७ रूपयांची वाढ झाली होती.

घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. याआधी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता २९ रुपयांची दरवाढ झाली आहे. गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्या अजूनही तोटा सहन करत आहेत. त्यामुळे भविष्यात गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे (PMUY) भारतीय कुटुंबांना स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस खरेदी करता येतो.

कोणत्या शहरात किती रूपयांना मिळणार गॅस सिलिंडर?

दिल्ली: पूर्वीच्या ९१३ रुपयांच्या तुलनेत ९४२ रुपये

मुंबई: ९४१.४० रुपये, पूर्वी ९१२.५० रुपये

कोलकाता: पूर्वीच्या ९३९ रुपयांच्या तुलनेत ९६८ रुपये

चेन्नई: ९५७.५० रुपये, पूर्वीच्या ९२८.५० रुपयांच्या तुलनेत

पाटणा: १०३१.५० रुपये, पूर्वीच्या १००२.५० रुपयांच्या तुलनेत

हैदराबाद: ९९६ रुपये, पूर्वीच्या ९६७ रुपयांच्या तुलनेत

लखनौ: पूर्वीच्या ९५१ रुपयांच्या तुलनेत ९८० रुपये

जयपूर: पूर्वीच्या ९१६.५० रुपयांच्या तुलनेत ९४५.५० रुपये

बंगळूर: ९४४.५० रुपये, पूर्वीच्या ९१५.५० रुपयांच्या तुलनेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणेंची SIT कडून चौकशी सुरू

Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने स्वीकारली लाच; असा फसला ACB च्या जाळ्यात

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाची मोठी अपडेट, बेसिक सॅलरीत 'इतकी' वाढ होण्याची शक्यता

Raj Thackeray On Vishwas Nangare Patil: ..तर राजीनामा द्या! राज ठाकरेंनी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना सुनावलं

Maharashtra politics : फडणवीसांसोबत विमानात काय बोलणं झालं? ठाकरेंनी एका वाक्यात दिले सूचक संकेत, म्हणाले...

SCROLL FOR NEXT