Diesel sales limit at private petrol pumps in India saam tv
बिझनेस

महत्त्वाची बातमी! डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा; पेट्रोल पंपांवर एका ग्राहकाला किती मिळणार डिझेल?

Diesel Purchase Limit : पुढील काही दिवसात नागरिकांना डीझेल खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.हाती आलेल्या माहितीनुसार, खासगी पेट्रोल पंप मालकांनी संभाव्य इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवलीय.

Bharat Jadhav

  • खासगी पेट्रोल पंपावर एका ग्राहकाला किती डिझेल मिळणार

  • डिझेल खरेदीवर मर्यादा का घालण्यात आली

  • डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर नवा नियम

जर तुमच्याकडे वाहन आहे तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसात इंधन टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिझेल खरेदीवर मर्यादा घालण्यात येणार आहेत. खासगी कंपन्यांनी डिझेल विक्रीबाबत एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, आता पेट्रोल पंपांवर उपलब्ध असलेल्या डिझेल खरेदीच्या प्रमाणावर मर्यादा घालण्यात आलीय.

मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली इंधन पुरवठा टंचाई निर्माण झालीय. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, खासगी इंधन विक्रेत्यांनी आपल्या केंद्रांवर डिझेलच्या विक्रीवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

खरेदीवर किती असेल मर्यादा?

Jio-BP ने आपल्या अनेक केंद्रांवर प्रति ग्राहक ५० लिटर डिझेलची मर्यादा निश्चित केलीय. दैनंदिन विक्रीवरही ६,००० लिटरची मर्यादा घातली आहे. आता Jio-BP पेट्रोल पंपांवरील एक ग्राहक एकावेळी जास्तीत जास्त ५० लिटर डिझेल खरेदी करू शकतील. या पंपांवर यापूर्वी दररोज सरासरी ११,००० लिटर डिझेलची विक्री होत असायची. परंतु आता कंपनीने प्रत्येक केंद्रासाठीचा डिझेलचा कोटा साधारणपणे निम्म्याने कमी केला आहे. त्याचप्रमाणे नायरा एनर्जीनेही आपल्या पंपांवरील पुरवठा ७० ते २०० लिटरच्या दरम्यान मर्यादित केला आहे.

सरकारी तेल कंपन्यांसाठी कोणतीच मर्यादा नाहीये

इंडियन ऑईल (IOCL), HPCL आणि BPCL यांसारख्या सरकारी तेल विपणन कंपन्यांनी याबाबत सांगताना म्हटलंय की, त्यांच्या पेट्रोल पंपांवर विक्रीवर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध नाहीत. देशातील १,००,००० हून अधिक इंधन केंद्रांपैकी सुमारे ९०% केंद्रे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांद्वारे चालवली जात असल्याने सामान्य ग्राहकांवर होणारा याचा परिणाम अत्यंत मर्यादित आहे.

दुर्गम भागांत चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या व्यावसायिक वाहनांना (उदा. ट्रक) काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण सरकारी कंपन्यांच्या तुलनेत 'जिओ-बीपी' (Jio-bp) आणि 'नयारा एनर्जी' (Nayara Energy) सारख्या खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंपांचे जाळे अनेक महामार्गांवर आणि ग्रामीण भागांत अधिक आहेत. परिणामी जर या खासगी पंपांवर डिझेलचे रेशनिंग (मर्यादित पुरवठा) सुरू झाले, तर संबंधित चालकांकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या नेत्याला हिसका दाखवणार,राजू शेट्टींचा रोख कोणावर?

भाजपविरोधात बंडखोराला शिंदेसेनेचा पाठिंबा? पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस वाढणार

IDBI बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँकेतील हिस्सेदारी विकणार,कोणत्या कंपनीसोबत झाला 52,877 कोटींचा करार?

Cold Drinks Facts : कोल्ड्रिंक्सची बाटली उघडताच बुडबुडे का येतात? ९०% लोकांना माहिती नाहीत ही कारणे

SCROLL FOR NEXT