बिझनेस

LIC च्या 'या' प्लॅनमध्ये एकदाच जमा करा पैसे, तुमचं आयुष्य जाईल चैनीत; मिळेल 12000 रुपये पेन्शन

Smart Pension Scheme: या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एलआयसीचा स्मार्ट पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचं असेल तर कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

Bharat Jadhav

भारतीय जीवन विमा निगमकडून समाजातील सर्व वर्गातील लोकांसाठी एक खास योजना आणली जाते. एलआयसीची अशी एक योजना आहे, यात ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देखील मिळते. ही योजना सर्वांसाठी उपलब्ध आहे. आयुष्यभर पेन्शन या योजनेतून मिळते. एकरकमी प्रीमियम योजनेअंतर्गत, तुम्हाला फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतात. LIC च्या स्मार्ट पेन्शन योजनेत तुम्ही एक किंवा ज्वाइंट खाते उघडू शकता.

ज्वाइंट खात्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीला पेन्शन मिळते. ही योजना निवृत्ती झाल्यानंतरही रेगुलर पेन्शन मिळते. यासह तात्काळ पेन्शनचा पर्यायही आपण निवडणू शकतात.

कधी मिळेल पेन्शन?

पेन्शन योजनेचा फायदा कोणत्याही नागरिकाला घेता येतो. स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत पॉलिसीहोल्डर मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. योजनेमध्ये एन्युटीचा ऑप्शनही उपलब्ध आहे. पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना या योजनेचा फायदा मिळेल. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एलआयसीचा स्मार्ट पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचं असेल तर कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. तर ऑफलाइननेही एजेंटकडून या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये काय आहे?

LIC ची ही योजना सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ इच्छिणाऱ्या लोकांना भारीय. त्यांना नियमित उत्पन्न या योजनेतून मिळते. LIC स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला नियमित अंतराने आयुष्यभर पेन्शन मिळते. तुम्ही प्लॅनमध्ये सिंगल आणि जॉइंट ॲन्युइटी दोन्ही पर्याय निवडू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही आंशिक किंवा पूर्ण पैसे काढण्याचा पर्याय देखील निवडू शकता.

किती गुंतवणूक आवश्यक आहे?

ज्या लोकांना त्यांच्या निवृत्तीनंतर एकरकमी उत्पन्न हवे, त्यांच्यासाठी ही योजना बनवण्यात आलीय. या योजनेत तुम्ही कमीत-कमी एक लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. पती-पत्नी ज्वाइंट म्हणजेच संयुक्त खाते उघडू शकतात. पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रीमियम एकाच वेळी जमा करावा लागेल.

योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाहीये. तुमची पेन्शन किती असेल ते जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असते. पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. योजनेंतर्गत 18 ते 100 वर्षे वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकता.

कमीत कमी किती मिळेल पेन्शन

तुम्हालाही दर महिन्याला पेन्शन घ्यायची असेल, तर तुम्हाला किमान 1000 रुपये, दर तीन महिन्यांनी 3000 रुपये, दर सहा महिन्यांनी पेन्शन मिळवायचे असेल तर 6000 रुपये मिळतील. पण तुम्हाला वार्षिक पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दरवर्षी 12000 रुपये पेन्शन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT