Top 5 Best Selling Cars Saam Tv
बिझनेस

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Top 5 Best Selling Cars: ऑगस्ट 2024 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 5 कार्सबद्दल आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Satish Kengar

भारतात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात कारची खरेदी विक्री होते. हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. यातच कार कंपन्यांनी त्यांचे विक्री रिपोर्ट जाहीर केले आहेत. यावेळी मारुती सुझुकीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर क्रेटा आणि पंच मागे राहिले आहेत. अशातच आपण भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 5 कारची माहिती जाणून घेणार आहोत.

मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza)

सध्या मारुती सुझुकी ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2024) ब्रेझाच्या 19,190 युनिट्सची विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ब्रेझाच्या एकूण 14,572 युनिट्सची विक्री झाली होती. यावेळी ब्रेझाच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्रेझाने विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटा आणि टाटा पंचला मागे सोडलं आहे.

या कारमध्ये बसवलेले पॉवरफुल इंजिन मायलेजच्या बाबतीतही अव्वल आहे. ब्रेझामध्ये पेट्रोलसोबतच तुम्हाला सीएनजीचा पर्यायही मिळेल. मारुती ब्रेझामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे. मारुती सुझुकी ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Ertiga )

गेल्या महिन्यात एर्टिगाच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात एर्टिगाच्या 18,580 युनिट्सची विक्री झाली होती. तर या वर्षी जुलैमध्ये एर्टिगा फक्त 15, 701 ग्राहकांनी खरेदी केली होती. म्हणजेच यावेळी या कारच्या मागणी वाढ झाली आहे. ही 7 सीटर कार आहे, जी तिच्या पोवाफुल्ल इंजिन आणि स्पेससाठी ओळखली जाते.

ह्युंदाई क्रेटा (Hyundai CRETA)

टॉप 5 बेस्ट कारच्या यादीत Hyundai Creta तिसऱ्या क्रमाकावर आहे. गेल्या महिन्यात क्रेटाच्या 16,762 युनिट्सची विक्री झाली होती. या वर्षी जुलैमध्ये क्रेटा 17,350 ग्राहकांनी खरेदी केली होती. ही एक मध्यम आकाराची एसयूव्ही आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Wagon R)

WagonR विक्री आतापर्यंत कधीही कमी झाली नाही. गेल्या ऑगस्टमध्ये वॅगनआरच्या 16,450 युनिट्सची विक्री झाली होती. तर या वर्षी जुलैमध्ये वॅगनआरच्या 16,191 युनिट्सची विक्री झाली होती आणि ती टॉप 10 कारच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती.

टाटा पंच (Tata Punch)

टाटा पंच विक्री भारतात सातत्याने कमी होत आहे. वरच्या क्रमाकावरून ही कार आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. टाटाने गेल्या महिन्यात 15,643 पंच कराची विक्री केली. तर या वर्षी जुलैमध्ये ही टाटा एसयूव्ही 16,121 ग्राहकांनी खरेदी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT