Delhi Laxmi Yojana News  AI Image
बिझनेस

Laxmi Yojana : महिलांसाठी महत्त्वाची बातमी! लक्षमी योजनेचे दरमहा २५०० रुपये खात्यात जमा होणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Delhi Government Laxmi Yojana : दिल्ली लक्ष्मी योजनेबाबत मुख्यमंत्री रेखा गुप्ता सरकारचा मोठा निर्णय! महिलांना दरमहा मिळणारे 2,500 रुपये जानेवारी 2027 पर्यंत FD मध्ये जमा होणार.

Alisha Khedekar

दिल्लीतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'दिल्ली लक्ष्मी योजने'बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा मिळणारे 2,500 रुपये आता जानेवारी 2027 पर्यंत थेट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FD) जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांना मिळणारी आर्थिक मदत थांबणार नाही, असा सरकारचा प्रयत्न आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल वॉलेटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) प्रणालीचा वापर केला जात आहे. मात्र, या प्रणालीद्वारे आतापर्यंत केवळ 53 महिलांपर्यंतच पैसे पोहोचले आहेत. त्यामुळे सरकारने सध्या संपूर्ण रक्कम FD मध्ये जमा करण्याचा पर्याय निवडला आहे. आतापर्यंत 4,488 पेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या नावाने FD तयार करण्यात आल्या आहेत. डिजिटल वॉलेटमधील अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. तोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था सुरू राहणार आहे.

दिल्ली सरकारने ऑगस्ट महिन्यात ही योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना दरमहा 2,500 रुपयांची मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा फायदा सुमारे 17 लाख महिलांना मिळावा, असे सरकारचे नियोजन आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात यासाठी 5,110 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेत महिलांना दोन पर्याय देण्यात आले होते. पहिल्या पर्यायात 1,000 रुपये डिजिटल वॉलेटमध्ये आणि 1,500 रुपये बचत योजनेत जमा होणार होते. दुसऱ्या पर्यायात संपूर्ण 2,500 रुपये तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह FD किंवा RD मध्ये जमा करता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : हिवाळ्यात गूळ खाताय? मग सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन बिलावरून राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसकडून शरद पवार अन् एम.के स्टॅलिन यांची मनधरणी सुरू

Shoes-socks Odour : हिवाळ्यात शूज काढताच येतो घाणेरडा वास? ट्राय करा 'या' ५ घरगुती ट्रिक्स, पाय राहतील मुलायम

Mumbai-Girgaon : गिरगावच्या नावामागे दडलाय शेकडो वर्षांचा इतिहास, तुम्हाला माहीत आहे का?

Gold Rate Today : आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT