Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: दिव्यांग नागरिकांना ५००० रुपये; कोणत्या राज्याने घेतला निर्णय? काय आहे योजना? जाणून घ्या

Delhi Government Scheme For Disabled People: दिल्ली सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना ५००० रुपये दिले जाणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजना या दिव्यांग नागरिकांसाठी आहे. दिल्ली सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत दिव्यांग लोकांना दर महिन्याला ५००० रुपये दिले जातात.याबाबत माहिती मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली आहे.

सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, ६० टक्क्यांपेक्षा जास्त विकलांग असणाऱ्या लोकांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Government Scheme)

याबाबत माहिती देताना सांगितले की,ही योजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत रजिस्ट्रेशन एका महिन्याच्या आत सुरु होण्याची शक्यता आहे. या योजनेचा प्रस्ताव गर्वनर यांच्याकडे पाठवण्याची शक्यता नाही. कारण, हे जनतेचे पैसे आहेत ते त्यांच्या कल्याणासाठी खर्च केले जाणार आहेत.

दिल्ली सरकराने Specailly Abled लोकांना दर महिन्याला ५००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. एवढा मोठा निधी देणारे दिल्ली हे एकमेव राज्य आहे. (Scheme For Disabled People)

२०११ च्या जणगणनेनुसार, देशात दिव्यांग व्यक्तींची संख्या १.६८ कोटी आहे. ही संख्या देशातील लोकसंख्येच्या २.२१ टक्के आहे.RPwD अधिनियम २०१६ नुसार, २१ प्रकारचे दिव्यांग लोक आहेत. यामध्ये लोकोमीटर विकलांगता, अंधत्व, ऐकायला कमी येणे, बोलायला न येणे, तसेच बौद्धिक विकलांगता असणारे लोक जास्त आहे. याच लोकांना मदत करण्याची ही योजना दिल्ली सरकारने राबवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: चाणक्यांचा इशारा! 'या' ५ प्रकारच्या लोकांपासून दूर राहा, नाहीतर आयुष्य होईल बर्बाद

Palak Patta Chaat Recipe : हिवाळ्यात घ्या चटपटीत नाश्त्याचा आस्वाद, झटपट बनवा पालक पत्ता चाट

Maharashtra Live News Update: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर बोरामणी गावाजवळ कंटेनरला अपघात

Maharshtra Politics: बीएमसी आरोग्य केंद्राचं फित कोण कापणार? मालाडमध्ये भाजप–काँग्रेस आमनेसामने|VIDEO

Money Saving Tips: खर्च खूप वाढतोय अन् बचत कमी होतेय? वेळीच या स्टेप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT