Farmers running a successful dal mill unit in their village, turning agriculture produce into profit. saam tv
बिझनेस

Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

Profitable Agri-Based Business: डाळ मिल व्यवसाय हा भारतातील सर्वात फायदेशीर लघु-स्तरीय कृषी उद्योगांपैकी एक आहे. डाळींच्या वाढत्या मागणीमुळे शेतकरी गावांमध्ये डाळ प्रक्रिया युनिट सुरू करू शकतात आणि रोजगार निर्मिती करु शकतात.

Bharat Jadhav

  • डाळ मिल उद्योग हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा व्यवसाय आहे.

  • डाळींची देश-विदेशात मोठी मागणी आहे.

  • गावातच उद्योग सुरू करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करता येतो.

शेतकरी मित्रांनो शेती करताना व्यवसायदेखील करायचा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट बिझनेस आडिया घेऊन आलो आहोत. भारतात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. डाळी आपल्या आहारात प्रथिनांचे महत्त्वाचे स्रोत असल्याने डाळीची मागणी मोठी असते. त्यामुळे डाळींवर योग्य प्रकारे प्रक्रिया करून बक्कळ पैसा कमावू शकतात. तर मित्रांनो व्यवसाय आहे, डाळ मिल उद्योग.

डाळ मिल उद्योग केवळ आर्थिक उत्पन्न देणारं नाही, तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणारा व्यवसाय आहे. कृषी क्षेत्रात विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये डाळी हा एक महत्त्वाचा घटक आहे. देशातच नव्हे तर परदेशातही डाळींना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे प्रक्रिया करणारे डाळ मिलचा उद्योग खूप फायदेशीर ठरेल.

असा सुरू करा डाळ मिलचा उद्योग

कच्च्या मालाचा सहज पुरवठा होतो आणि वाहतूक सुलभ असते. अशा ठिकाणी डाळ मिल टाका. यासह उत्पादनाची प्रक्रिया आणि वितरणासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरू करा. डाळ मिल स्थापनेसाठी सुरुवातीला २ ते ५लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

कर्ज मिळते

सरकारी बँक आणि खाजगी बँकांमधून या उद्योगासाठी कर्ज मिळते. तसेच कृषी आधारित उद्योगासाठी विविध सरकारी योजना उपलब्ध आहेत, त्याची माहिती घ्या. नाहीतर खासगी गुंतवणूकदारांकडून ही तुम्ही भांडवल मिळवू शकतात. या मिलमध्ये तुम्ही तूर, हरभरा, मूग इत्यादी डाळींना पॉलिस करू शकतात. शेतकऱ्यांकडून या डाळी घेऊ शकतात. डाळी मिलसाठी लागणाऱ्या मशिनरीची किंमत १ ते ४ लाख रुपया आहे. तर या कामासाठी ४ माणसांची गरज असते.

भांडवल गोळा झालं, उद्योगही सुरू झाला, पण उत्पादित केलेला माल कुठे विकायचा असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. त्यासाठी तुम्ही मार्केटचा तपास करा. किती प्रमाणात डाळींची खप होते, याची माहिती घ्या. आसपासच्या डिलरसोबत टायप करा. स्वत: पॅकेजिंग करून स्वत:चा ब्रॅड वापरून विक्री करू शकतात.

डाळ मिल उत्पादन प्रक्रिया

डाळीतील दगड, माती, वाळू आणि इतर अशुद्धता काढून टाकण्याची प्रक्रिया केली जाते.

साल काढणे: डाळींची साल काढून टाकली जाते, त्यामुळे डाळ अधिक शुद्ध आणि गुणवत्तावाली डाळ तयार होते.

डाळींचे पिठ तयार करण्यासाठी दळण्याची प्रक्रिया देखील यात करता येते. उत्पादनाची गुणवत्ता तपासून योग्य वर्गीकरण करावं. उत्पादनाचे पॅकेजिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावे.

मिलसाठी लागणारे साहित्य

धान्याची चाडी

१० ते १५ किलो तूर ,व इतर धान्य त्यात बसतील एवढे मोठे भांडे घ्या. या भांड्याच्या बुडाला एक झडप असते. त्यांच्याद्वारे रोलर मध्ये जे धान्य पडते त्याचा वेग कंट्रोल केला जात असतो.

रोलर

रोलर हा मिलचा महत्वाचा भाग. ज्याच्यात तुरीला क्रश केले जाते, बेअरिंगच्या मदतीने फिरणारा गोल दंडुका आणि त्या खाली असणारी चाळणी यांच्यात घर्षण होऊन तुरीवरील फोलपट बाहेर फेकले जाते.

पंखा

तुरीतून बाहेर पडणाऱ्या फोलपटला बाजूला करण्यासाठी हा पंखा असतो . यामुळे डाळ आणि फोलपटे वेगळी होतात.

चाळणी संच

यात वेगवेगळ्या दोन चाळण्या असतात ज्या डाळीतील चांगली डाळ आणि तुकडे आणि पावडर वेगळी करण्यास मदत होते.

ऑगर कन्व्हेअर

हा महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये वेगळी झालेल्या डाळीवर प्रकिया होते. यातून थेंबाथेंबाने डाळीवर तेल सोडलं जाते.

ताशी १०० किलो डाळ बनवायची किंवा तेवढ्या क्षमतेची मिल खरेदी करायची झाल्यास ती जवळपास ८०,००० ते १,००००० पर्यंत खर्च येतो. जर तुम्हला तशी ४०० किलो डाळ बनवायची झाल्यास तेवढ्या क्षमतेच्या डाळ मिलसाठी साधारण ३.५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. तर ७०० किलो पर्यंत डाळीवर प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ४.५ लाख खर्च येत असतो.

विविध सरकारी योजना

प्रमुख मंत्री ग्रामोद्योग योजना: ग्रामीण भागात उद्योग स्थापनेसाठी सहाय्य केलं जातं.

राष्ट्रीय कृषी विकास योजना: कृषी उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक मदत यातून मिळत असते.

एमएसएमई कर्ज योजना: लघु व मध्यम उद्योगांसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध केलं जातं.

या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, सबसिडी, आणि कर्ज मिळते असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT