DA Hike: Saam Tv
बिझनेस

DA Hike: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना डबल गिफ्ट मिळणार; महागाई भत्ता वाढणार

DA Hike Before Diwali: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना डबल गिफ्ट मिळणार आहे. एक म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाऊ शकते आणि आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट येऊ शकते.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

लवकरच होऊ शकते महागाई भत्त्याची घोषणा

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट येण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे. लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढतो. दरम्यान, आया वर्षी एकदा महागाई भत्ता वाढला आहे त्यानंतर आता दुसऱ्यांदा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. याचसोबत अजून एक आनंदाची बातमी आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत मोठे पाऊल उचलले आहे.

कधी होणार महागाई भत्त्याची घोषणा? (DA Hike Annoucement Date)

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ केली जाणार आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करु शकते. सरकार महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर हा महागाई भत्ता ८ टक्को होईल.

१.२ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

महागाई भत्त्यात वाढ झाल्यावर त्याचा थेट फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट वाढणार आहे. दसरा आणि दिवाळीचा मूहूर्त साधत सरकार याबाबत घोषणा करु शकते.

वर्षाला दोनदा वाढतो महागाई भत्ता

वर्षभरात दोनदा महागाई भत्ता ठरवला जातो. एकदा जानेवारी जे जून या कालावधीसाठी आणि दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी महागाई भत्ता ठरवला जातो. आता जून महिन्यात लागू होणारा महागाई भत्ता लांबणीवर गेला आहे. हा महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. याआधी जानेवारी-जून या कालावधीत महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यानंतर महागाई भत्ता ५५ टक्के झाला होता. यानंतर आता जुलै-डिसेंबर या कालावधीत महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच दिला इलेक्ट्रिक करंट; अपघात दाखवण्याचा कट फसला

Positive Vastu Tips: घराच्या दरवाजावर बांधा 'ही' एक गोष्ट; कधीच संपणार नाही पैसा

Gold Rate : तब्बल १०४ टन सोनं भारतात आलं, भारतातील सोन्याच्या किंमती कमी होणार? वाचा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम

Crime News : अहिल्यानगर हादरलं! किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

SCROLL FOR NEXT