DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० दिवसांत वाढणार महागाई भत्ता; पगारात किती होणार वाढ? जाणून घ्या

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. होळीआधी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती.

Siddhi Hande

केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करणार आहे. वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. जानेवारी महिन्यात ही वाढ केली जाते. मागच्या वर्षी सरकारने होळीच्या आधी महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता यावर्षी महागाई भत्त्यात कधी वाढ होणार याकडे केंद्रिय कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.

होळी फक्त १० दिवसांवर आली आहे. त्यामुळे या १० दिवसांत महागाई भत्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित येत्या दहा दिवसांत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याबाबत अपेक्षा आहे. ७ व्या वेतन आयोगात वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. पहिली वाढ १ जानेवारीपासून केली जाते. तर दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ १ जुलैपासून केली जाते.

महागाई भत्ता किती टक्के वाढणार?

सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. यामध्ये एंट्री लेवल ते सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर बेसिक सॅलरी १८००० रुपयांवर अधिकचा ५४० रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.

महागाई भत्त्याचे कॅलक्युलेशन

जर कोणत्या कर्मचाऱ्याचा पगार ३०,००० रुपये असेल. त्याची बेसिक सॅलरी १८००० रुपये असेल तर त्याचे अर्धे म्हणजेच ९००० रुपये महागाई भत्ता मिळतो. त्यात जर ३ टक्क्यांनी वाढ केली तर महागाई भत्ता ९५४० रुपये मिळणार आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली तर ९७२० रुपये मिळणार आहे.

मागील वर्षी सरकारने मार्च महिन्यात महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाही महागाई भत्त्यात ३-४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT