DA Hike: Saam Tv
बिझनेस

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी वाढणार महागाई भत्ता

DA Hike Announcement for Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुढच्या आठवड्यात महागाई भत्ता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा ठरु शकते. मिडिया रिपोर्टनुसार, १५ ऑगस्ट रोजी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा जो महागाई भत्ता वाढणार आहे तो १ जुलैपासून लागू होणारा आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या पगारात तुम्हाला महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता कधी वाढतो? (When Will Dearness Allowance Hike)

वर्षभरात दोन वेळा महागाई भत्ता वाढतो.जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होते. यामुळे देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ होणार आहे. प्रत्येक सहा महिन्यांना हा महागाई भत्ता वाढतो.

महागाई भत्ता हा महागाईच्या आकड्यांवर (CPI) वर निर्धारित असतो. जुलै २०२५ चा आढावा घेण्यात आला आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. १५ ऑगस्टपूर्वी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)

केंद्र सरकारी कर्मचारी आता ८व्या वेतन आयोगाची वाढ पाहत आहेत. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ असू शकतो. त्यामुळे जर कोणाचा मूळ पगार १८००० रुपये असेल तर २.४६ फिटमेंट फॅक्टरनुसार त्याचा पगार ४४,२८० होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १५ ऑगस्ट रोजी वाढू शकतो. पुढच्या आठवड्यात याबाबत घोषणा होऊ शकते.

वर्षातून किती वेळा महागाई भत्ता वाढतो?

वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढला जातो.

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?

आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. मात्र, वेतन आयोग लागू होण्यास उशीर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार; मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान

Home Workout की Gym, वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन आहे सर्वात बेस्ट?

MLC Election: राज्यात पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स', महायुतीचे शेकडो नगरसेवक ठाण्यात; राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT