DA Hike google
बिझनेस

DA Hike: दिवाळीपूर्वी पुन्हा वाढणार महागाई भत्ता? कर्मचाऱ्यांना मिळाले पगारवाढीचे हे संकेत

DA Increase Likely Before Diwali: दिवाळीपुर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. AICPI निर्देशांकातील वाढीमुळे पगार, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि पेन्शनवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि रिटायरझालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबद्दल (DA) पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे. यंदा एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली असून, याचा लाभा ५० लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे ६५ लाख रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. याचसोबत महागाई दिलासाही (DR) वाढवण्यात आला होता.

पुढे इंडियन बँक्स असोसिएशनने मे, जून आणि जुलै २०२६ या कालावधीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्येही वाढ जाहीर केली. तसेच भारतीय रेल्वेनेही आपल्या कर्मचारी आणि रिटायरझालेल्यांसाठी २ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून यंदाच्या वर्षातल्या दुसऱ्या DA वाढीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

महागाई भत्ता वाढीचा निर्णय प्रामुख्याने ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स (AICPI-IW) या निर्देशांकाच्या आधारे घेतला जातो. मार्च २०२६ मध्ये हा निर्देशांक १४९.१, एप्रिलमध्ये १४९.९ आणि मेमध्ये १५०.८ इतका नोंदवला गेला. या आकडेवारीच्या आधारे यावेळी ३ ते ४ टक्के DA वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय जून २०२६ च्या AICPI-IW आकडेवारीनंतर आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल.

गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता केंद्र सरकारने दिवाळीआधी महागाई भत्त्यात वाढ करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. २०२४ आणि २०२५ मध्येही दिवाळीआधी DA वाढ जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळीआधी कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महागाई भत्ता वाढल्याने फक्त महिन्याच्या सॅलरीतच वाढ होत नाही, तर भविष्य निर्वाह निधी (PF), रिटायरमेंट सॅलरी, ग्रॅच्युइटी आणि इतर भत्यांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी DA वाढ हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

SCROLL FOR NEXT