DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike : DA 60% वरून थेट 64%? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए सध्या ६० टक्के आहे. जुलै २०२६ मध्ये ३ ते ४ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. ६४ टक्के डीए झाल्याने पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी सध्या दोन मोठ्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. एक म्हणजे जुलै २०२६ पासून लागू होणारी महागाई भत्त्याची वाढ (DA)आणि दुसरं म्हणजे आठव्या वेतन आयोग. सध्या उपलब्ध आकडेवारी आणि वेगवेगश्या अहवालांनुसार, जुलैच्या DA मध्ये ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

जानेवारीत २% DA वाढ

२०२६ च्या पहिल्या सहामाहीत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा DA २ टक्क्यांनी वाढवून ६० टक्के केला होता. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू झाली. आता जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी DA मध्ये पुन्हा वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे तो ६३ किंवा ६४ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

AICPI-IW ठरवते DA वाढ

महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांसाठीच्या AICPI-IW निर्देशांकाच्या आधारे केली जाते. उपलब्ध आकडेवारीत महागाईचा कल लक्षात घेता, जुलैच्या DA मध्ये ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

६४% DA झाल्यास पगार किती वाढेल?

DA ६० वरून ६४ टक्के झाल्यास १८,००० रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा DA १०,८०० रुपयांवरून ११,५२० रुपये होईल. म्हणजेच महिन्याला ७२० रुपयांची वाढ होऊ शकते. २५,५०० रुपये बेसिकवर DA १५,३०० वरून १६,३२० रुपये, तर ३५,४०० रुपयांच्या बेसिकवर २१,२४० वरून २२,६५६ रुपये होईल.

आठव्या वेतन आयोगाकडूनही मोठ्या अपेक्षा

आठव्या वेतन आयोगाबाबतही चर्चा सुरू असून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे. सध्या २.५७ फिटमेंट फॅक्टर असून तो ३.८३ पर्यंत करण्याची मागणी आहे. मात्र, अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.

आठवा वेतन आयोग ३ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थापन झाला असून आयोगाला अहवाल साद करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मे २०२७ पर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारच्या निर्णयावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमधील प्रत्यक्ष वाढ स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT