8th Pay Commission  meta ai
बिझनेस

8th Pay Commission: महागाई भत्ता 63% वर फिटमेंट फॅक्टर किती असेल? कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित समजून घ्या

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. आठव्या वेतन आयोगात १.८६ किंवा १.९० फिटमेंट फॅक्टर मिळाल्यावर पगारात मोठी वाढ होईल.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता मूळ वेतनाच्या ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार असून, कर्मचाऱ्यांना जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची थकबाकी सुद्धा मिळेल. पण या निर्णयाचा परिणाम फक्त सध्याच्या पगारावरच नाही, तर आठव्या वेतन आयोगातल्या फिटमेंट फॅक्टरच्या गणितावरही होऊ शकतो.

या निर्णयाचा फायदा ४८.५४ लाख केंद्रीय आणि ६८.७१ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. पेन्शनधारकांचा महागाई दिलासा (DR) सुद्धा ३ टक्क्यांनी वाढवून ६३ टक्के करण्यात आला आहे.

१८ हजार बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती फायदा?

समजा, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. याआधी ६० टक्के DA नुसार त्याला दरमहा १०,८०० रुपये मिळत होते. आता ६३ टक्के DA नुसार ही रक्कम ११,३४० रुपये होईल. म्हणजेच महिन्याला ५४० रुपयांची वाढ होणार आहे. जुलै ते ऑक्टोबर या ४ महिन्यांचा एकूण एरियर २,१६० रुपये मिळू शकतो.

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरचं महत्त्व काय?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या वेतन आयोगातल्या बेसिक पगाराचे नवीन वेतन आयोगातल्या बेसिक सॅलरीत रुपांतर करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर जुन्या वेतन आयोगातला DA नव्या बेसिक पगारात समायोजित केला जातो. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमधली संपूर्ण वाढ ही प्रत्यक्ष पगारवाढ नसते. त्यातला काही भाग जुन्या DA ची भरपाई करण्यासाठी वापरला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मसाल्यांमधील भेसळीविरोधात FDA ची राज्यव्यापी धडक कारवाई

Shivali Parab: अमेरिकेत पोहोचली शिवाली परब! गुलाबी फ्लोरल ड्रेसमधील सुंदर फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा फटका! मुंबईसह ठाण्यात पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

IPL 2027 : आगामी आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल! या 4 दिग्गजांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Maharashtra Poltiics: निवडणूक निकालानंतर महायुतीतील तणाव वाढला, एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावत नेत्यांना दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT