DA Hike News  AI Image
बिझनेस

DA Hike Update : महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार? दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

DA Hike Latest Update News : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA Hike 2026 अपडेट! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्यास DA ६३ टक्के होणार का? पगारात किती वाढ होईल आणि सरकारची घोषणा कधी होणार, जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा

  • दिवाळीपूर्वी DA Hike जाहीर होण्याची शक्यता

  • अहवालांनुसार, महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याचा अंदाज

  • वाढ मंजूर झाल्यास DA ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या (DA Hike) घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दसऱ्याच्या आधी सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दसरा उलटून गेला तरी याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष दिवाळीपूर्वी होणाऱ्या घोषणेकडे लागले आहे. दरम्यान सरकारने DA Hike ची घोषणा केली तर, कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारने अद्याप बैठकीची तारीख किंवा महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढणार, याची अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान सरकारची बैठक झाल्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळणार आहे.

महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढू शकतो?

अहवालांनुसार, यंदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३ टक्के महागाई भत्ता वाढ मिळण्याचा अंदाज आहे. सध्या महागाई भत्ता ६० टक्के आहे. जर सरकारने ३ टक्के वाढ मंजूर केली, तर तो ६३ टक्क्यांवर पोहोचेल. मात्र, हा केवळ अंदाज असून अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये सरकारने जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ मंजूर केली होती. त्यानंतर महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला होता. जानेवारी २०२६ पासून तो वाढून ६० टक्के करण्यात आला.

पगारात किती रुपयांची वाढ होणार?

महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार दरमहा मिळणाऱ्या रकमेत पुढीलप्रमाणे वाढ होऊ शकते.

१८,००० रुपये मूळ वेतन असल्यास ५४० रुपये वाढ

२५,००० रुपये मूळ वेतन असल्यास ७५० रुपये वाढ

३०,००० रुपये मूळ वेतन असल्यास ९०० रुपये वाढ

४०,००० रुपये मूळ वेतन असल्यास १,२०० रुपये वाढ

महागाईच्या आकडेवारीवर ठरणार निर्णय

महागाई भत्ता वाढवताना सरकार औद्योगिक कामगारांसाठीच्या AICPI-IW चा विचार करते. ऑगस्ट २०२६ मध्ये हा निर्देशांक १.२ अंकांनी वाढून १५४.४ वर पोहोचल्याचे दिलेल्या आकडेवारीत नमूद आहे. याच आधारावर महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्के वाढ होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष आहे. दिवाळीपूर्वी निर्णय झाल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Sign : मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं 'हे' ३ संकेत, वेळीच ओळखा!

Maharashtra News Live Update: इथेनॉलबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा झटका

Top 5 Signs of Liver Issues: डोळ्यांतील या खुणा सांगतात तुमचं लिव्हर कसं काम करतय? फॅटी लिव्हरची 5 लक्षणे वेळीच ओळखा

Election: मोठी बातमी! राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी?

Shocking : मोठी बातमी! भारतीय खेळाडूला अटक; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT