DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता वाढणार; पगारात इतक्या रुपयांची होणार वाढ

DA Hike 2026 Announcement: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२६ च्या महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार?

लवकरच होणार घोषणा

कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो. एकदा जानेवारी आणि जुलै अशा दोन महिन्यात महागाई भत्ता वाढतो. दरम्यान, अजूनही जानेवारी २०२६ च्या महागाई भत्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. यावेळी महागाई भत्त्यात किती वाढ होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी २०२६ मध्ये महगाई भत्ता वाढणार आहे. हा महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढू शकतो. यामुळे तुमचा महागाई भत्ता ६० टक्के होऊ शकतो. सध्या महागाई भत्ता ५८ टक्के आहे. यामुळे तुमच्या पगारावर किती परिणाम होणार आहे ते जाणून घ्या.

पगार किती वाढणार? (DA Hike Announcement)

जर तुमचा मूळ पगार १८००० रुपये असेल तर दर महिन्याला ३६० ते ५४० रुपये वाढू शकतात. २९२०० रुपयांच्या मूळ पगारावर कर्मचाऱ्यांच्या पगारात ५८४ ते ८७६ रुपये वाढू शकते. मूळ पगार ५६,१०० रुपये असेल तर त्यात १,१०० रुपयांचा वाढ होऊ शकते. दोन लाख रुपये मूळ पगार असेल तर पाच ते सात हजारांची वाढ होऊ शकते.

महागाई भत्ता हा ठरावीक कॅल्क्युलेशननुसार ठरला जातो. मागच्या वर्षीच्या महागाई ग्राहक किंमत निर्देशकांच्या (CPI- IW) सरासरीवर हा महागाई भत्ता अवलंबून असतो.त्यानुसार महागाई भत्ता वाढवला जातो. यावर्षी डीए वाढण्यास उशीर झाला आहे. तुम्हाला जानेवारी २०२६ पासूनचा महागाई भत्ता मिळू शकतो. प्रत्येक महिन्याच्या फरकाची थकबाकी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT