Crop Insurance Saam tv
बिझनेस

Crop Insurance: कोणत्या पिकांसाठी कधी करता येईल विमा संरक्षण नोंदणी? जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

Crop Insurance: मृगबहर २०२५ हंगामासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या फळबागांची विमा संरक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Bharat Jadhav

हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. पीक विम्यासाठी नोंदणी करण्यासाठी कृषी विभागाने नवीन पोर्टल सुरू केले आहे. मृगबहर २०२५ च्या हंगामासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या फळबागांच्या विमा संरक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू झालीय.

यापैकी चार प्रमुख पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ आहे. तर इतर पिकांसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १४ आणि ३१ जुलै या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

कोणत्या पिकांसाठी कोणती अंतिम तारीख?

संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष – ३० जून २०२५

मोसंबी, चिकू – 3३० जून २०२५

डाळिंब – १४ जुलै २०२५

सीताफळ – ३१ जुलै २०२५

असा करा अर्ज

कृषी विभागाचे अधिकृत पोर्टल – https://pmfby.gov.in/farmerLogin – शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणी आणि AgriStack योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेत.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड

बँक पासबुक

7/12 उतारा (जमीन धारणा दाखला)

ई-पिक पाहणीसह Geo-tagged फोटो

AgriStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक

तसेच ई-पिक पाहणी नोंद नसल्यास विमा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

या योजनेचा उद्देश हवामान बदलांमुळे फळपिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जर कमी पाऊस किंवा खंडित पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. अधिक पाऊस किंवा आर्द्रतेमुळे झाडांचे नुकसान झाले तर या परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा योजनेतून भरपाई दिली जाते.

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतल्यानंतरही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करता येते. मात्र विमा अर्जासाठी प्राथमिक टप्प्यात काही कागदपत्रे अनिवार्य असतात. असून, त्यात कोणतीही त्रुटी असल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrity Mangalsutra Designs: सेलिब्रिटींना घातलेली 5 युनिक मंगळसूत्र, या आहेत ट्रेडिंगच्या डिझाईन्स

Kamali Serial: तुला तर मी मारलंय ना? अनिकानेच रचला कामिनी आजीला मारण्याचा कट; 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट!

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महापौरांच्या कारवरील लाल दिवे काढण्यात आले

Copper Vs Glass Bottle Health: तांब्याच्या की काचेच्या बाटलीतील पाणी चांगलं? तुमच्या-आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल

Bullet Train: 'मेड इन इंडिया' बुलेट ट्रेन लवकरच धावणार, तिकिटाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT