5 Central Government Schemes For Common People Know Details in Marathi Saam Tv
बिझनेस

5 Central Government Schemes: केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ

Top Five Government Schemes Know Information in Marathi: आज आपण केंद्र सरकारच्या पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

Satish Kengar

Central Government Top 5 Schemes:

केंद्र आणि राज्य सरकार सामान्य नागरिकांचं जीवन सुलभ व्हावं, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून अनेक योजना राबवत असते. यातच आज आपण केंद्र सरकारच्या अशाच पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

1. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

देशातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी जानेवारी 2015 मध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली होती. पैशांअभावी आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकलेल्या कुटुंबांच्या, विशेषत: मुलींच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चासाठी पैसे वाचवू शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावर उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात मॅच्युर होते. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून अभ्यासासाठी पैसे काढता येतात. मात्र संपूर्ण रक्कम 21 वर्षानंतरच काढता येते. (Latest Marathi News)

2. उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मे 2016 मध्ये ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी सारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक प्रमुख योजना म्हणून सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे ही योजना सुरू केली. जे लोक कोळसा, झाड्याच्या फांद्या इत्यादी पारंपारिक स्वयंपाक इंधन वापरत होते त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना सरकारने सांगितले की, पारंपरिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही घातक परिणाम होतात. यासाठीही योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

3. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi)

या योजनेचा लाभ अल्प व अत्यल्प शेतकरी कुटुंबांना (ज्यांना दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे) मिळतो. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

4. आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana)

ही आरोग्य विमा योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गरीब वर्गातील कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. गरीब बीपीएल कार्डधारकांना मोफत उपचार मिळावेत हा यामागचा उद्देश आहे. देशभरात अशी बीपीएल कार्ड धारक गरीब कुटुंबांची संख्या सुमारे 10 कोटी आहे. तर 50 कोटी लोक याचा लाभ घेऊ शकतील.

5. प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana)

ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. या अंतर्गत ज्या लोकांकडे कच्ची घरे आहेत, ज्यांना छप्पर नाही, ते पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत गरिबांना घरे बांधण्यासाठी पैसे दिले जातात. याशिवाय कमी उत्पन्न असलेल्यांना गृहकर्ज अनुदानही दिले जाते. 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT