LPG Cylinder Saam TV
बिझनेस

LPG Cylinder Price Hike : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका; गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ

LPG Cylinder : मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1,684 रुपयांना विकला जाणार आहे.

प्रविण वाकचौरे

Gas Cylinder Price Hike :

तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 204 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1,684 रुपयांना विकला जाणार आहे.

इतर महानगरांमध्ये किमती किती वाढल्या?

कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,636.00 रुपयांऐवजी 1,839.50 रुपयांना खरेदी करावा लागणार. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 204 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत 1,482 रुपयांवरून 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. (Latest News)

तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1,695 रुपयांवरून 1898 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जाणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत?

महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी मोठी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तो जुन्याच दरावर कायम आहे. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

सप्टेंबर 2023 मध्ये तेल कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. गेल्या महिन्यात 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 158 रुपये झाली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महाग होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Surya Gochar: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, ४ राशींना लागणार मोठा जॉकपॉट; नोकरीत होईल प्रगती

Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

Sangli Breaking : वादळी वाऱ्यामुळं भिंत कोसळली, देवीच्या कार्यक्रमाला आलेल्या ६ भाविकांचा दबून मृत्यू

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT