मुंबईत प्रवेश करण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आजपासून मुंबईच्या वेशीवर असलेल्या ५ टोलनाक्यांनावर आकारण्यात येणारा टोल वाढणार आहे. ५ रुपायंपासून ते ३० रुपयांपर्यंत ही टोलवाढ आहे.
टोलवाढीची घोषणा आधीच झाली आहे. आजपासून त्याची अमलबजावणी सुरु होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ आजपासून (१ ऑक्टोबर) लागू होत आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही वाढीव किंमत असणार आहे.
टोल व्यवस्थापनाचे कंत्राट देतानाच दर ३ वर्षानंतर टोलवाढ होणार असल्याचा करार आहे. त्यानुसार ही नियमीत दरवाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रस्त्यांवरील सुविधांचा अभाव आहे, अशात ही टोलवाढ का ? असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. (Latest News)
कुठे होणार टोल वाढ?
ऐरोली, दहिसर पच्छिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यांवर ही टोल वाढ होणार आहे. मागील २५ वर्षांपासून या टोल नाक्यांवर टोल वसुली सुरु आहे.
२००२ मध्ये कारसाठी २० रुपये, मिनीबस २५ रुपये, ट्रक बस ४५ रुपये तर अवजड वाहन ५५ रुपये टोल होता. यानंतर मागील काही वर्षात यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. आता पुन्हा वाढ होत असल्याने महागाईत आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
कार - ४५ रुपये (५ रुपये वाढ)
मिनी बस - ७५ (१० रुपये वाढ)
ट्रक/बस - १५० (२० रुपये वाढ)
अवजड वाहन - १९० (३० रुपये वाढ)
मासिक पास - १६०० (१०० रुपये वाढ)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.