CNG Price Hike Saam Tv
बिझनेस

Auto-Taxi Fare : 'कॉमन मॅन'ला झटका मिळणार; CNG किंमती वाढल्यानं रिक्षा, टॅक्सी भाडेही वाढणार?

Auto Taxi Fare May Be Increase: सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने आता रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. (CNG Price Hike)

सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. याआधी सीएनजी ७५ रुपये प्रति किलो असं विकलं जात होतं. परंतु आता सीएनजीची किंमत ७७ रुपये प्रति किलो झाली आहे. सध्या देशातील सार्वजनिक वाहतुकीची वाहने , रिक्षा, टॅक्सी सर्वाधिक सीएनजी गॅसवर चालत आहे. त्यामुळे भाड्यात वाढ करण्याची मागणी रिक्षाचालक आणि टॅक्सी संघटनांनी केली आहे.

सीएनजीच्या किंमती वाढल्यानंतर रिक्षाच्या भाड्यात २ रुपयांनी वाढ व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबईच्या रिक्षाचालक संघटनांनी ही मागणी केली आहे. (Auto Rikshaw fare May Be Increase)

सीएनजी गॅसमुळे वाहनधारकांची जवळपास ४९ आणि १४ टक्के बचत झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या तुलनेत सीएनजी गॅसची किंमत कमी आहे. त्यामुळे सर्वाधिक वाहने ही सीएनजी गॅसवर चालत आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या देशातील २,३२२ बस या सीएनजीवर चालत आहे. ७०,००० टॅक्सी, ५ लाख खाजगी कार, ४ लाख रिक्षा आणि ३२००० ट्रक सीएनजीवर चालत आहेत. त्यामुळे सीएनजीच्या वाढत्या किंमतींमुळे रिक्षा, टॅक्सीचालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. यामुळे ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढवले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT