CNG-PNG Price Drop Saam tv
बिझनेस

CNG-PNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला फटका! CNG-PNG गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा आजचे दर

CNG-PNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. सीएनजी गॅस १ रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सीएनजीची किंमती ८१ रुपये प्रति किलो झाली आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सीएनजी-पीएनजीचे दर वाढले

वाहनधारक आणि गृहिणींसाठी चिंताजनक बातमी

मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. वाहनधारक आणि गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस महागणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने CNG आणि PNG च्या दरात वाढ जाहीर केली आहे. CNG च्या दरात प्रति किलो 50 पैशांची तर PNG च्या दरात 1 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरानुसार CNG ८१ रुपये प्रति किलो आणि PNG ५० रुपये प्रति युनिट झाला आहे.

सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरवाढीचा परिणाम रिक्षा, टॅक्सी आणि बस प्रवाशांबरोबरच घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. दरवाढीनंतरही CNG पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त पर्याय असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटला धक्का लागणार असल्याचे दिसत आहे.

सीएनजी आणि पीएनजीचा वापर

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप जास्त वाढत आहेत. त्यामुळेच अनेकांनी सीएनजी वाहने घेतली आहेत. सीएनजीचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. मात्र, आता हे दरदेखील सतत वाढताना दिसत आहे. याचसोबत पीएनजी गॅसच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. पीएनजी गॅस हा घराघरात वापरला जातो. या किंमती वाढल्याने महिलांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

आजचे पेट्रोलचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र फार काही बदल झालेला दिसत नाहीये. आज मुंबईत १ लिटर पेट्रोल १०३.५० रुपयांना विकले जात आहे तर १ लिटर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७७ रुपये तर डिझेलची किंमत ८७.६७ रुपये आहे. या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: सोन्याच्या दरवाढीचा स्फोट होणार, सोनं ३ लाखांवर जाणार; तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

क्रिकेट विश्वावर शोककळा, दिग्गज खेळाडूच्या वडिलांचं निधन

Maharashtra Live News Update : धुळवडीनिमित्त ब्रास बँडवर थिरकल्या आमदार मंदा म्हात्रे

Wednesday Horoscope: उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, कामाचा ताण जाणेल, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Rajya Sabha: भाजपचे अध्यक्ष आता खासदार होणार, 'या' राज्यातून मिळाली उमेदवारी, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT