Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण ! महाराष्ट्रात आज एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार इतके रुपये; तपासा आजचे दर

Petrol Diesel Price Today 10th July 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

कोमल दामुद्रे

Maharashtra Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत $73 च्या आसपास आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत 0.53 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $73.47 वर व्यापार झाली.

त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेल 0.06 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह प्रति बॅरल $ 78.12 वर होते. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी कंपन्याकडून कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीत आंतरारष्ट्रीय बाजारात वाढ झाली होती.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

देशाची राजधानी नवी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल दिसून आला आहे. नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत (Price) 102.63 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.

2. तुमच्या शहरातील दर कसे तपासाल ?

दररोज जर तुम्हाला पेट्रोल व डिझेलच्या किंमची तपासायच्या असतील तर तेल कंपन्या एसएमएस सुविधा देतात. HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर, इंडियन ऑइल (Oil) RSP <डीलर कोड> 9224992249 वर आणि BPCL ग्राहक <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT