Tata Tigor EV Car Saam tv
बिझनेस

EV Car: ही आहे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये देते 315 KM ची रेंज; जाणून घ्या किंमत

Tata Tigor EV Car: Tata Tigor EV ही भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. ही कार एका चार्जमध्ये 315 KM ची रेंज देते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घ्या...

Satish Kengar

बाजारात सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अनेक लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत. यातच तुम्हीही कमी बजेटमध्ये जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. ही इलेक्ट्रिक कार आहे टाटाची Tigor EV. ही एक पॉवरफुल इलेक्ट्रिक कार असून ही EV 315 किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

Tigor EV 12.49 लाख एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. ही एक फाय सीटर कार आहे. ज्यामध्ये कंपनी 26 kWh ची हाय पॉवर बॅटरी देते. ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येते. ही एसी व्हेंट्स आणि मागील सीटवर पॉवर विंडोसह येते. कारच्या टॉप मॉडेलमध्ये अलॉय व्हील, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार.

Tata Tigor EV चे टॉप मॉडेल 14.70 लाख रुपये ऑन रोड किंमतीत उपल्बध आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. ही कार 9.4 तासात पूर्ण चार्ज होते. या कारमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये XE, XT, XZ+ आणि XZ+ लक्स असे चार प्रकार उपलब्ध आहेत.

Tata Tigor EV 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. यात 14 इंची अलॉय व्हील्स आहेत. कारमध्ये एलईडी लाईट्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि एअरबॅग्ज आहेत. कंपनी ही फॅमिली कार तीन आकर्षक रंगांमध्ये देत आहे.

Tata Tigor EV फीचर्स

यात ऑटो एसी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदरेट अपहोल्स्ट्री, ड्युअल कलर इंटीरियर, 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो हेडलैंप आणि एडजस्टेबल ड्राइवर सीट सारखे फीचर्स यात मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

SCROLL FOR NEXT