Character Certificate meta ai
बिझनेस

Character Certificate : चारित्र्य पडताळणीसाठी एजंटला पैसे देताय? थांबा, फक्त १५९ रुपयांत घरबसल्या मिळवा सर्टिफिकेट

Police Verification : चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी आता पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही. महा-ई-सेवा केंद्रातून ऑनलाइन अर्ज करा, १५९ शुल्क भरा आणि पोलिस पडताळणीनंतर साधारण सात दिवसांत प्रमाणपत्र मिळवा.

Sakshi Sunil Jadhav

चारित्र्य पडताळणी दाखला कसा काढायचा? महा-ई-सेवा केंद्रातून करा ऑनलाइन अर्ज, ७ दिवसांत मिळेल प्रमाणपत्र (Police Verification Certificate) गरज असते. आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलिस ठाण्यात सतत जाण्याची गरज नाही. नागरिकांना आता घरबसल्या किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्रातून ऑनलाइन अर्ज करता येतो.

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना १५९ रुपयांची फी ऑनलाइन भरावी लागते. अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज केल्यानंकर संबंधित पोलिस ठाण्याकडून अर्जदाराची पडताळणी केली जाते. आवश्यक असेल तर पोलिसांकडून अर्जदाराच्या घरी भेट देऊनही माहिती तपासली जाते.

पोलिसांकडून पडताळणीची प्रोसेस पूर्ण झाल्यावर साधारणपणे सात दिवसांत प्रमाणपत्र ऑनलाइन दिलं जातं. अर्जदाराला हे प्रमाणपत्र संबंधित अधिकृत संकेतस्थळावरून मिळू शकतं.

कुठे पडताळणी आवश्यक आहे?

सरकारी आणि काही खासगी नोकऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचं ठरतं. याशिवाय ॲटोरिक्षा, स्कूल बस आणि इतर खासगी-शासकीय प्रवासी वाहनांच्या चालकांना बॅच काढताना पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्राची महत्त्वाची असते. तसेच पासपोर्ट प्रोसेस, पायलट किंवा हवाई सुंदरीच्या नोकरीसाठी आणि निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतानाही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जाऊ शकते.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

अर्जदारांना महा-ई-सेवा केंद्रातून किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जाची प्रोसेस पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून पडताळणी केली जाते आणि प्रोसेस पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र ऑनलाइन मिळतं. अधिकृत वेबसाइट https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज सुमारे ८० ते ९० अर्ज येतात. अर्जदारांना जमेल तितक्या लवकर, साधारण सात दिवसांच्या आत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पे अँड पार्कचा स्थायी समोर प्रस्ताव

Student Protest : विधानसभेवर विद्यार्थ्यांचं आंदोलन, जंतर मंतरसारखी परिस्थिती; पहा Video

उजव्या की डाव्या, शरीराच्या कोणत्या बाजूला किडनी असते? ९९ टक्के लोकांना माहीत नाही

शरद पवारांच्या खासदारांची मोदींकडे सर्वात मोठी मागणी, पंतप्रधानांचे आश्वासन, ३० मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

Chapati Tips : कणिक मळताना फक्त पीठात 'हा' एक पदार्थ मिसळा; १०-१२ तास चपाती राहील मऊ, लुसलुशीत

SCROLL FOR NEXT