Lakhpati Didi Yojana Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi: केंद्राची महिलांसाठी खास योजना! स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Lakhpati Didi Yojana: केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना ५ लाखापर्यंंत बिनव्याजी कर्ज मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.त्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यातील एक योजना म्हणजे लखपती दीदी योजना. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. केंद्राच्या या योजनेत महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेत महिलांना पैसे दिले जातात. या योजनेत महिलांना स्वतः चा स्टार्टअप सुरु करण्यासाठी ५ लाखांचा लोन दिला जातो. या योजनेत कोणतेही व्याज लागत नाही.

या योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. ५० वर्षांपर्यंतच्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत नसावा.

लखपती दीदी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. याचसोबत या महिला बचत गटाशी जोडलेल्या असाव्या. तेव्हाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना त्यांना बचत गटात जाऊन आपला बिझनेस प्लान आणि कागदपत्रे जमा करावे लागतील. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, इन्कम प्रुफ, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो हे कागदपत्रे द्यावी लागेल. यानंतरतच तुम्हाला लोन मिळेल.

लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्टार्टअप सुरु करु शकतात. या योजनेच्या मिळालेल्या पैशातून तुम्ही लहान व्यवसाय सुरु करु शकतात. यामुळे इतर अनेक महिलांनादेखील रोजगार उपलब्ध होईल. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला फक्त मुद्दल द्यावी लागणार आहे. व्याज आकारले जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

Maharashtra News Live Update:दुष्काळाचा संत्र पिकाला मोठा फटका

Pitru Paksha : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

SCROLL FOR NEXT