Free Mobile Scheme Saam Tv
बिझनेस

Free Mobile Scheme: केंद्र सरकार देणार मोफत स्मार्टफोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Free Mobile Scheme Fact Check: सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात केंद्र सरकार मोफत स्मार्टफोन देणार असल्याचे म्हटले जात आहे. या मेसेजमागचं सत्य काय?

Siddhi Hande

तुम्हाला आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे. सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची मोफत मोबाईलची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

सरकार देणार मोफत स्मार्ट फोन

मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातोय...तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून, मोबाईल सरकार कुणाला देणार आहे...? मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

डिजीटल सेवा योजना केंद्र सरकारने सुरू केलीय.या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे.

हा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांना हे खरं वाटू लागलंय...काहींना तर लिंकही मोबाईलवर येतेय...मात्र, खरंच ही योजना आहे का...? लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का...? असे प्रश्न उपस्थित झाल्याने आमच्या टीमने याची पडताळणी केली. त्यातून अशी कोणतीही योजना नसल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा

केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही

डिजीटल सेवा योजना राजस्थान सरकारची

राजस्थान सरकारने महिलांना फोन वाटले होते

केंद्राची अशी कोणती योजना नाही...लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातायत...मोबाईल अनेक जण वापरत असल्याने असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं...कारण, मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा झालाय...त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते...मात्र, आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT