DA Hike 2026 latest news saam tv
बिझनेस

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढला?

Central Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. महागाई भत्त्यात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मोठी घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत (DR) ३ टक्के वाढ मंजूर केली आहे. हा वाढीव भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. या निर्णयाचा देशातल्या १.१६ कोटींहून जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. दिवाळीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट देण्यात आलं आहे.

DA आणि DR मध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली असून, हा वाढीव दर १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात, तर पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते.

पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?

DA आणि DR वाढल्यावर नेमका किती आर्थिक फायदा होणार, हे संबंधित कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीवर किंवा लागू पेन्शनवर अवलंबून असतं. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना समान रक्कम मिळणार नाही.

जुलैपासूनची थकबाकी मिळणार का?

DA ची ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू झाल्यावर पात्र कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलैपासूनच्या कालावधीची थकबाकी मिळू शकते. मात्र, थकबाकीची नेमकी रक्कम, वितरणाची तारीख आणि सुधारित दर याबाबत तपशील अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaju Khanyache Fayde: 1 महिना दररोज काजू खाल्ले तर शरीरात काय बदल होईल?

Nashik Traffic: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणामुळे नाशिकमध्ये वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर...

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची धडक, ४६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १३ पोलिसांसह २५ जणांना अटक

अमरावती शिक्षक मतदारसंघात उलटफेर! दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये गेम फिरला, किरण सरनाईक यांचा विजय, काँग्रेसचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT