CBSE Recruitment
CBSE Recruitment Saam Tv
बिझनेस

CBSE Recruitment: CBSE मध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळाने वेगवेगळ्या पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

CBSE च्या भरतीमध्ये २९ जागांसाठी ही भरती आहेय प्रादेशिक संचालक, अंडर सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज कसावा करावा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे.

अर्ज असा करावा

या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे cbse.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्ही भरतीबाबत सर्व माहिती उपलब्ध होईल. या भरतीसाठी ऑनलाइन करु शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फॉर्मसोबत सीबीएसई बोर्डच्या ऑफिसला पाठवावी लागणार आहे. तुम्हाला जाँइंट सेक्रेटरी (ए एंड एल), सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन, शिक्षा केंद्र, २ कम्युनिटी सेंटर, प्रीत विहार, दिल्ली या पत्त्यावर कागदपत्रे पाठवावी लागतील.

ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे. जर तुम्हाला काही अडचणी आल्यावर techhelp.cbse@gmail.com किंवा rectt@cbse.gov.in.या ईमेल आयडीवर संपर्क करा.

या पदासांठी शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. याची सर्व माहिती सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीत निवड झालेल्या पदानुसार वेतन निश्चित करण्यात आले आहे. यात जॉइंट पोस्टसाठी तुम्हाला दर महिना ३७,४०० ते ६७,००० रुपये प्रति महिना वेतन असेल. तर असिस्टंट सेक्रेटरी मीडिया रिलेशनसाठी दरमहिना १५६०० ते ३९१०० रुपये वेतन दिले जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: केसात गजरा अन् पैठणी साडी; सई तू दिसतेस लय भारी

Methi Pithala: अस्सल गावरान झणझणीत मेथी पिठलं, बनवा फक्त ५ मिनीटांत

Pandharpur Dindi VIDEO: अनुदान न मिळाल्याने दिंडीप्रमुखांनी व्यक्त केली सरकारवर नाराजी!

Marathi Live News Updates : मुंबईसह, दिल्ली आणि हैदराबाद येथे ईडीची छापेमारी, ४१ लाखांची रोकड जप्त

PCMC Recruitment: १० वी पास उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT