Car & Bike Insurance Rules  saam tv
बिझनेस

Car & Bike Insurance Rules : सिग्नल तोडणाऱ्यांनो सावधान! आता इन्शुरन्ससाठी मोजावे लागतील जास्त पैसे?

Insurance Rules : कार आणि बाईक इइन्शुरन्सचे नियम बदलण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना जास्त प्रीमियम भरावा लागू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकार वाहन विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. नव्या प्रस्तावानुसार, सतत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना विमा रिन्यू करताना जास्त पैसे मोजावे लागतील.

एवढंच नाही, तर वैध इन्शुरन्स नसलेल्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळण्यावरही निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या (TOI) वृत्तानुसार, रस्त्यावरचे अपघात कमी करणं आणि जास्तीत जास्त वाहनांना विमा संरक्षण मिळवून देणे हा या प्रस्तावामागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

वाहतूक नियम मोडल्यास इन्शुरन्स महागणार?

सरकारच्या प्रस्तावानुसार, वाहनचालकाने मागील वर्षभरात किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत, याचा विचार विम्याचा प्रीमियम ठरवताना केला जाऊ शकतो. म्हणजेच, सिग्नल तोडणे किंवा इतर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना वाहन विम्यासाठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. दुसरीकडे, वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना याचा कमी फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्या नियमभंगासाठी किती अतिरिक्त प्रीमियम आकारला जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कारसाठी ४ तर बाईकसाठी ६ वर्षांची पॉलिसी?

वाहन विम्यामध्येही महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. यानुसार, कार मालकांना एकाच वेळी प्रीमियम भरून चार वर्षांची विमा पॉलिसी घेता येऊ शकते. तर दुचाकींसाठी सहा वर्षांच्या विमा पॉलिसीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यामुळे दरवर्षी विमा रिन्यू करण्याची कटकट कमी होऊ शकते. इलेक्ट्रिक वाहनांच्या बेस प्रीमियममध्ये बदल करण्याचाही विचार सुरू आहे.

विमा नसेल तर पेट्रोल मिळणार नाही?

'नो इन्शुरन्स, नो फ्युएल' हा प्रस्तावही चर्चेत आहे. यासाठी हरियाणा आणि उत्तर प्रदेशामध्ये प्रायोगिक चाचणी घेतली जाऊ शकते. दोन्ही राज्यातल्या प्रत्येकी पाच पेट्रोल पंपावर ANPR कॅमेरे बसवण्याची योजना आहे. मात्र, हा अद्याप प्रस्ताव असून देशभरात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद? नेमकं कारण काय?

शिवसेना शाखेत एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंचा फोटो; बघून श्रीकांत शिंदेंचा संताप अनावर, पदाधिकाऱ्यांना झापलं

Maharashtra News Live Update: मुसाफिरखान्याच्या तोडक कारवाईला स्थगिती कायम! उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना खडे बोल

Starting and stopping bike: बाइक सुरू केल्यानंतर लगेच बंद केली तर इंजिनवर काय परिणाम होतो?

Phulwara Movie: नऊवारी साडी, ठसकेबाज अदाकारी अन् लावणीचा साज; 'फुलवरा'मध्ये वैदेही-प्रियदर्शिनींचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT