rent canva
बिझनेस

Rent Rule 2025: भाडेकरू घराचा ताबा घेऊ शकतो का? नियम जाणून घेतल्याशिवाय ही चूक करू नका

Rent Rule News In Marathi: तुम्ही भाड्याने दिलेल्या घरावर भाडेकरु ताबा घेऊ शकतो का? जाणून घ्या.

Ankush Dhavre

शहरात घर भाड्याने देण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. नवीन घर घेतलं आणि तिथे जर आपण राहत नसू तर ते घर एखाद्या गृहस्थाला भाड्याने द्यायचं आणि दरमहा चांगलं भाडं वसूल करायचं. काहींच्या मते २० ते ३० हजारांचा EMI भरण्यापेक्षा भाड्याने राहून ३ ते ४ हजार भाडं दिलेलं बरं. मात्र घर भाड्याने देताना काही नियम असतात. ते नियम तुम्हाला माहित असायलाच हवे. कोणते आहेत ते नियम? जाणून घ्या.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, काही भाडेकरू बरीच वर्ष एकाच घरात राहतात. १०-१२ वर्ष झाली की, ते घर मालकाला कायदे सांगून घुडकवून लावतात. जर एखादा भाडेकरू १० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच करत राहत असेल, तर घरमालक त्याला घर खाली करण्यासाठी आग्रह करू शकतो का?

लिमिटेशन ॲक्ट १९६३

लिमिटेशन ॲक्ट १९६३ हा ॲक्ट भाडेकरू आणि घरमालक यांच्याशी संबधित आहे. या ॲक्टनुसार खाजगी मालमत्तेवरील मर्यादेचा वैज्ञानिक कालावधी हा १२ वर्ष इतका आहे. याला ताब्याचा दिवस असे म्हणतात. असं झाल्यास निर्णय भाडेकरूच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता असते.

भाडेकरूला मिळेल घराचा ताबा?

घरमालकाकडून झालेल्या निष्काळजीपणाचा भाडेकरू फायदा घेऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही भाडेतत्त्वावर घर देत असाल तर भाडे करारावर स्वाक्षरी घेणे अतिशय महत्वाचे आहे. भाडे करारावर स्वाक्षरी असणे अतिशय गरजेचे आहे. हा करार तुम्ही ११ महिन्यांचा करावा. हा करार दरवर्षी बदलत रहावा. यासह त्यात नियम आणि अटी लिहिलेले असावे. जर फसायचं नसेल, तर हे नियम नक्की लक्षात ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT