Anand krishnan Son Saam Tv
बिझनेस

Anand krishnan Son:४०,००० कोटींची संपत्ती सोडून बनला संन्यासी; प्रसिद्ध उद्योगपती आनंद कृष्णन यांच्या मुलाचा निर्णय

Ven Ajhan Siripanyo Story: मलेशियातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद कृष्णन यांच्या मुलाने संन्यास घेतला आहे. त्यांनी ४० हजार कोटींची संपत्ती सोडून संन्यास घेतला आहे.

Siddhi Hande

मलेशियाचे टेलिकॉमचे दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद कृष्णन यांच्या मुलाने सन्यास घेतला आहे. वेन अजान सीरीपान्योने आपली लक्झरी लाइफस्टाइल सोडून संन्यास घेतला आहे. त्यांचे वडील अब्जाधीश आहे.

भारतीय वंशाचे आनंद कृष्णन यांना दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जाते. त्यांची जवळपास ४०,००० कोटींची संपत्ती आहे. वेन अजान सिरीपान्योने हे या संपत्तीचे वारसदार होते. परंतु त्यांनी साधेपणाचे जीवन निवडले आहे.

आनंद कृष्णन हे टेलिकॉम, मिडिया, तेल आणि गॅस, रिअल इस्टेट, सॅटेलाइट अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एअरसेल नावाची कंपनी होतील. एअरसेल कंपनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला स्पॉन्सरशिपदेखील दिली होती. आनंद कृष्णन हे मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. (Anand krishnan son Story)

आनंद कृष्णन हे उत्तम व्यावसायिक तर आहेत. त्याचसोबत ते समाजसेवकदेखील आहे. त्यांनी नेहमी शिक्षण आणि इतर कामांमध्ये आपले योगदान दिले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आनंद कृष्णन यांच्या मुलाने १८ वर्षांचा असतानाच संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. (Anand Krishnan Son Become Monk)

याबाबत अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. काही रिपोर्टनुसार, त्यांनी एका रिट्रीटसाठी मजा करताना संन्यासी जीवन जगायचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी काही काळासाठीच घेतला होता. परंतु नंतर त्यांनी कायमस्वरुपी संन्यासी होण्याचे ठरवले. आपल्या वडिलांचे साम्राज्य सांभाळण्याऐवजी त्यांनी साधेपणाने जीवन जगण्याचा निर्णय घेतला. ते आता भीक मागून आपले जीवन जगतात.

सिरीपान्योने या संपत्तीचा त्याग करुन २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ते संन्यासी म्हणून जीवन जगत आहे. याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT