Business Ideas Saam TV
बिझनेस

Business Ideas: एका रात्रीत नशीब पालटणार!; कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई मिळवून देणारे व्यवसाय

Ruchika Jadhav

Business Ideas: सध्या भारतात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. तरुणांच्या हातात नोकऱ्या नसल्याने अनेक जण व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. मात्र व्यवसाय करण्यासाठी सुद्धा जवळ पैसे असायला हवेत. भांडवलासाठी पैसे नसल्याने अनेक तरुणांचं स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न एक स्वप्नच राहतं. त्यामुळे आज कमी भांडवलात बक्कळ पैसे कमवून देणाऱ्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत. (Latest 3 Business Ideas News)

फास्ट फूड सेन्टर

सध्या अनेक व्यक्ती फास्ट फूडकडे जास्त आकर्षित होतात. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नागरिक फास्ट फूडकडे जास्त वळले आहेत. फास्ट फूड बनवण्याची पद्धत फार कठीण नसते. झटपट हे पदार्थ तयार होतात. यामुळे वेळही वाचतो त्यामुळे फास्ट फूट खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. नागरिकांची जास्त पसंती असल्याने तुम्ही या व्यवसायाची निवड करू शकता. यातून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न कमवता येईल.

मोबाइल रिपेअरिंगचे दुकान

आजकाल अगदी सामान्य कुटुंबातील व्यक्तीकडे देखील स्मार्ट फोन आहे. अशात फोनच्या अती वापराने त्यात काही बिघाड होतात. व्यक्तींचं आर्ध जीवन मोबाइलमध्ये गुंतलेलं असतं. फोन जरावेळ जरी बंद राहिला तरी अस्वस्थ वाटतं, अनेकांची मोठ मोठी कामं देखील रखडतात.

अशात तुम्हाला फोन दुरुस्त करण्याचे काम येत असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून चांगले पैसे घेऊ शकता. फोन महत्वाचा असल्याने साध्या कामांसाठी देखील व्यक्ती जास्तीची रक्कम देत फोन दुरुस्त करून घेण्यास तयार होतात. फोनचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. तुम्ही कमी किंमतीत देखील फोन दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू शकता.

किराणा दुकान

असा कोणताही चौक किंवा परिसर नाही जिथे किराणा दुकान नाही. प्रत्येक ठिकाणी किराणा दुकान (Grocery store) असणे गरजेचे आहे. काही खेड्यापाड्यांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी जाऊन किराणा भराला लागतो. त्यामुळे ज्या भागत ही सुविधा नाही तेथे तुम्ही किराणा दुकान सुरु करू शकता. किराणा दुकानासाठी साहित्य जास्त लागतं. मात्र त्याचा खर्च फार नसतो. शिवाय वस्तूवर दुप्पट नफा कमवता येतो. एखाद्या परिसरात तुमच्या शिवाय कुणाचेही दुकान नसेल तर नागरिक तुमच्याच दुकानात जास्त येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

SCROLL FOR NEXT