जर शेणापासून बनवलेल्या उत्पादनांचा व्यापार केला तर मोठा नफा सहज मिळू शकतो. तुम्हाला अशाच १० व्यवसायाची आयडिया देत आहोत. हे व्यवसाय तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता. शिवाय या व्यवसायांमध्ये कोणताही मोठा आर्थिक धोका नाहीये. वाढत्या महागाईच्या काळात एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं परडवत नाही. म्हणूनच लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी नव-नवीन व्यवसायाच्या आयडियाच्या शोधात असतात.
ज्या व्यवसायात कमी जागा आणि कमी खर्च लागतो. तसेच त्यातून भरघोस नफा मिळतो. असा व्यवसाय करायचा असेल, तर गायीच्या शेणाचा व्यवसाय सुरू करा. या व्यवसायातून सर्वात मोठी कमाई करू शकतात. शहरात हा व्यवसाय खूप तेजीत आलाय. आजच्या डिजिटल जगात लोक ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवत असतात. यात पूजा साहित्याचाही समावेश आहे. पूजेसाठी गोमूत्र आणि शेणाच्या गवऱ्या देखील लागतात.
शहरात गायीच्या शेणाच्या गवऱ्या मिळत नाहीत. अनेक लोक ऑनलाईनने गवऱ्या विकत घेत असतात. त्यावेळी जर शहरात गवऱ्याचा व्यवसाय सुरू केला तर बक्कळ कमाई होईल. हा व्यवसाय जे तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता. या व्यवसायांमध्ये कोणताही मोठा आर्थिक धोका नाही.
तुम्ही शेणाच्या गोवऱ्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी जास्त निधी आणि जागेची आवश्यकता भासत नाही. हा व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो. भारतीय संस्कृती जगभर पसरलीय. आता हिंदू धर्मावर विश्वास न ठेवणारे देखील पूजा आणि धार्मिक विधी करू लागलेत. गायीच्या शेणाच्या गवऱ्या आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत. अमेझॉनवर, ८ ते १० गवऱ्याच्या पॅकेटची किंमत १००० ते २००० रुपयांपर्यंत आहे.
आता गाईच्या शेणापासून सेंद्रिय रंग बनवला जातोय. छत्तीसगडच्या गोठ्यात पूर्णपणे सेंद्रिय रंग तयार केला जात आहे. पण हा रंग बाजारात असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या रंगापेक्षाही स्वस्तात विकला जातोय. खादी इंडियाने गायीच्या शेणापासून बनवलेला वैदिक रंग देखील लाँच केलाय. या व्यवसायातून तुम्ही दरमहा २ ते ५ लाख रुपये कमवू शकता. उत्पन्न तुमच्या ऑर्डरवर अवलंबून असते.
दिवसभरातील शेणातून ३० ते ५६ लिटर बायोगॅसचं उत्पादन केलं जातं. भारतात ३० कोटी पशुपालक आहेत. जर घरात लागणाऱ्या गॅसची पुरतता केली जाते. शेणापासून बनवण्यात आलेल्या बायोगॅसनं गॅसची पुर्तता केली जाते. दररोज १०० टन वेस्टचं प्रोसेस करणं प्लाट वाले जाते. प्रत्येक महिन्यात ९० हजार किलो सीबीजी, सहा किलो बायो फर्टिलाइजर आणि १५ लाख मीटर लिक्किड स्लरीचं उत्पादन केलं जाऊ शकतं.गायीच्या शेणापासून चटाई आणि विटांचा व्यवसाय केला जाऊ शकतो. मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट लॉन्च झाली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.