Budget 2026 Saam Tv
बिझनेस

Budget 2026: अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार, स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता

Budget 2026 Expectations of Old and New Tax Slab: देशाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. या नवीन अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पानंतर जुनी कर प्रणाली कायमची बंद होणार आहे.

Siddhi Hande

१ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

अर्थसंकल्पाकडून पगारदार वर्गाला खूप अपेक्षा

जूनी टॅक्स प्रणाली कायमची बंद होणार

नवीन कर प्रणालीत आणखी बदल होण्याची शक्यता

स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता

१ फेब्रुवारी रोजी देशाचा २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारवर्गासाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या नवीन अर्थसंकल्पानंतर जुनी टॅक्स प्रणाली पूर्णपणे बंद होणार आहे. नवीन टॅक्स प्रणाली अजूनच चांगली करण्यासाठी सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. चार्टर्जड अकाउटंटच्या मते, ही प्रोसेस थोडी हळू आहे परंतु सर्व करदात्यांना स्वेच्छेने नवीन प्रणालीकडे वळवण्याचा उद्देशाने आहे.

सरकार नवीन व्यवस्थांना प्रोत्साहन देणार

मिडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे. जुनी कर प्रणाली जबरदस्तीने काढून टाकण्यापेक्षा नवीन व्यवस्थेकडे आकर्षिक करणे. यामुळे हळूहळू करदाते नवीन प्रणाली स्वीकारतील. दरम्यान, आता नवीन अर्थसंकल्पामध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे करदात्यांना फायदा होऊ शकतो.

नवीन अर्थसंकल्पात विवाहित जोडप्यांसाठी संयुक्त फायलिंगचा ऑप्शन असू शकतो. वैद्यकीय खर्च, अंपगत्व काळजी आणि इतर काही गोष्टींच्या खर्चांसाठी स्टँडर्ड डिजक्शनमध्ये वाढ होऊ शकते.

२०२५ च्या अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरुन ७५,००० रुपये केले होते. यामुळे नोकरदार वर्गाला १२.७५ लाखांच्या उत्पन्नावर कर लागू होत नाही. यामध्ये आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे जुन्या आणि नवीन कर प्रणालीमधील दरी आणखी वाढेल. यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन नोकरदार वर्ग योग्य निर्णय घेईल. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ केल्यावर करदात्यांना खूप फायदा होणार आहे. करमुक्त उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

SCROLL FOR NEXT